मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १२ हजार दूध उत्पादकांच्या खात्यात १५ कोटी रुपयांचे अनुदान थेट जमा

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : राज्यातील सहकारी व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने प्रतिलिटर दुधासाठी ५ रुपये अनुदान देण्याचे निश्चित केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार १६७ दुध उत्पादकांच्या खात्यात १५ कोटी ८ लक्ष रुपयांचे अनुदान जमा झाले आहे, अशी माहिती जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी मनिषा हराळ यांनी दिली. सहकारी संघ […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : राज्यातील सहकारी व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने प्रतिलिटर दुधासाठी ५ रुपये अनुदान देण्याचे निश्चित केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार १६७ दुध उत्पादकांच्या खात्यात १५ कोटी ८ लक्ष रुपयांचे अनुदान जमा झाले आहे, अशी माहिती जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी मनिषा हराळ यांनी दिली.

सहकारी संघ व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रती लिटर ५ रुपये अनुदान देणे निश्चित केले आहे. या योजनेची जिल्हास्तरीय पडताळणी संबंधित जिल्हा दूग्धव्यवसाय विकास अधिकारी, सहायक निबंधक सहकारी संस्था (दूग्ध), जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या त्रिस्तरीय समितीमार्फत करण्यात येते. योजनेच्या प्रथम टप्प्यात सुरुवातीला एकूण ४ हजार ३८१ दूध उत्पादक लाभार्थी ठरले. त्‍यांना ४ कोटी ५२ लाख रुपये देण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात १४ हजार १७८ दूध उत्पादक लाभार्थी ठरले. त्‍यांच्या खात्‍यात १० कोटी ५६ लाख रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले. उर्वरित ६ हजार ३९२ दूध उत्पादक शेतकऱ्यांचे अनुदान त्‍यांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली!

Latest News

ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली! ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसी परिसरातील वडगाव कोल्हाटीतील गट नं. ९ मधील रहिवासी अनेक वर्षांपासून मुलभूत सुविधांपासून...
एसटी बसने दागिने घेऊन प्रवास करत असाल तर सतर्क व्हा, चोर महिलांच्या टोळ्या तुमचे दागिने चोरून होतील गायब!, शास्‍त्रीनगरातील महिलेचेही सव्वा लाखाचे दागिने नेले...
सिल्लोडच्या अन्वीत तरुणाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या
आदर्श घोटाळ्यातील संशयित महिला चक्क शिंदे गटात दाखल!  
जाधववाडीत २३ वर्षीय तरुणाची आत्‍महत्‍या, प्रेमप्रकरणातून टोकाचे पाऊल : पोलीस सूत्र
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software