भरधाव हायवाने दुचाकीस्वाराला मागून धडक देत चिरडले!; पैठणची घटना

On

पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : भरधाव हायवाने दुचाकीला मागून उडवले. यात दुचाकीवर मागे बसलेला व्यक्‍ती जागीच ठार झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी (२० जानेवारी) दुपारी तीनला पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील संत एकनाथ कारखान्यासमोर घडली. राम राधाकिसन मुळे (वय ४७, रा. ढोरकीन ता. पैठण) असे मृत्‍यू झालेल्याचे नाव आहे. राम मुळे हे मित्रासोबत दुचाकीने (क्र. एमएच २० एएन […]

पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : भरधाव हायवाने दुचाकीला मागून उडवले. यात दुचाकीवर मागे बसलेला व्यक्‍ती जागीच ठार झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी (२० जानेवारी) दुपारी तीनला पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील संत एकनाथ कारखान्यासमोर घडली.

राम राधाकिसन मुळे (वय ४७, रा. ढोरकीन ता. पैठण) असे मृत्‍यू झालेल्याचे नाव आहे. राम मुळे हे मित्रासोबत दुचाकीने (क्र. एमएच २० एएन ७९५३) पैठणकडे निघाले होते. संत एकनाथ कारखान्यासमोर मागून भरधाव आलेल्या खडी भरलेल्या हायवाने (एमएच २० सीटी ५२१९) त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यात राम मुळे हायवाच्या चाकाखाली येऊन जागीच ठार झाले, तर त्यांचा मित्र अपघातातून बालंबाल बचावला.

अपघाताची माहिती मिळताच पैठण एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. राम मुळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. अपघातानंतर हायवाचालकाने गाडी न थांबविताच पैठणच्या दिशेने पळ काढला. पैठण एमआयडीसी पोलिसांनी पाठलाग करून हायवासह चालकाला पैठण येथून ताब्यात घेतले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर

Latest News

चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. जुलै महिन्याचा हप्ता खात्यात जमा झाल्याचा संदेश लवकरच त्यांच्या...
जायकवाडी धरण तुडूंब भरताच विसर्ग सुरू, जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन
मॅरिड असूनही प्रेमाचा अट्टहास, तिला पती सोडायला लावून दुसरे लग्‍न केले, आता तिला एकीकडे म्हणतो ‘फालतू’; दुसरीकडे सांगतो, माझे अनेकींशी लफडे!!; लासूरस्टेशनच्या ३१ वर्षीय युवतीची पोलिसांत तक्रार
ऑगस्टमधील पहिला प्रदोष व्रत ६ की ७ ऑगस्टला? पूजा करण्याची तारीख, मंत्र आणि पद्धत जाणून घ्या
नागपंचमीला झोका खेळताना पडून शेतकऱ्याचा मृत्‍यू, पैठणची घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software