खून का बदला खून… भावाची हत्‍या करणाऱ्या प्लॉटिंग व्यावसायिकाची निर्घृण हत्‍या, पैठण हादरले, ६ मारेकरी पकडले

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील चितेगावमध्ये खून का बदला खून… चा खेळ खेळण्यात आला आहे. लहान भावाच्या हत्‍येचा बदला म्‍हणून प्लॉटिंग व्यावसायिकाचे अपहरण करून हत्‍या करण्यात आली. ही घटना मंगळवारी (१ जुलै) समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. बिडकीन पोलिसांनी ६ मारेकऱ्यांना अटक केली आहे. शेख अकबर शेख महेमूद ऊर्फ मियाँभाई (वय […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील चितेगावमध्ये खून का बदला खून… चा खेळ खेळण्यात आला आहे. लहान भावाच्या हत्‍येचा बदला म्‍हणून प्लॉटिंग व्यावसायिकाचे अपहरण करून हत्‍या करण्यात आली. ही घटना मंगळवारी (१ जुलै) समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. बिडकीन पोलिसांनी ६ मारेकऱ्यांना अटक केली आहे.

शेख अकबर शेख महेमूद ऊर्फ मियाँभाई (वय ५०, रा. चितेगाव, ता. पैठण) असे खून झालेल्या व्यक्‍तीचे नाव आहे. त्‍यांचा मृतदेह पैठण तालुक्‍यातील दादेगावजवळील पुलाखाली आढळला होता. तोंडाला जबर मारहाण केलेली दिसले. शेख अकबर यांचा मुलगा साहीलच्या तक्रारीवरून बिडकीन पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. शेख अकबर यांच्या दफनविधीवेळी चितेगावमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

खून का बदला…
चितेगाव येथील माजी सरपंच शेख वाहेद शेख याकूब यांचा लहान भाऊ शेख रऊफ याचा ६ वर्षांपूर्वी खून झाला होता. जिल्हा सत्र न्यायालयाने १ जानेवारी २०२५ रोजी या प्रकरणात निकाल देताना शेख अकबर यांच्यासह त्यांचे वडील, भाऊ व काका यांची निर्दोष मुक्तता केली होती. त्‍याचवेळी शेख वाहेद यांनी शेख अकबर व त्यांच्या कुटुंबियांना, तुमची निर्दोष सुटले असले तरी मी तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली होती.

अशी केली हत्‍या…
कायगाव येथील शाहरुख ऊर्फ फजल सरदार शेख याने ६ महिन्यांपूर्वी शेख अकबर यांच्यासोबत मैत्री केली. सोमवारी (३० जून) सकाळी ११ ला शेख अकबर हे शाहरुखला सोबत घेऊन जीपने घराबाहेर पडले होते. त्‍याचवेळी मारेकऱ्यांनी ठरल्याप्रमाणे त्‍यांचा पाठलाग सुरू केला. बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चितेगावजवळून त्‍यांचे अपहरण करून अत्‍यंत क्रूरतेने त्‍यांची हत्या केली व मृतदेह पैठण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दादेगावजवळील पुलाखाली फेकून दिला. पोलिसांना जीप चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेवराई तांड्याजवळ, मोबाइल पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरगाव फाट्याजवळ आढळला आहे. एकाचवेळी ४ पोलीस ठाण्यांना संशयितांनी कामाला लावले, हे विशेष.

६ संशयितांच्या मुसक्या आवळल्या…
या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल होताच मंगळवारी रात्री शाहरुख ऊर्फ फजल सरदार शेख (रा. कायगाव, ता. गंगापूर), सोनाजी ताराचंद भुजबळ (रा. दहिफळ, ता. शेवगाव) यांना कायगाव येथून तर बुधवारी (२ जुलै) सकाळी चितेगावचा माजी सरपंच शेख वाहेद शेख याकूब, लतीफ याकूब शेख, मोबीन मुनाफ सय्यद (तिघे रा. चितेगाव, ता. पैठण) व इकबाल अहेमद जमादार (रा. एमआयडीसी, पैठण) यांना चितेगाव येथून अटक करण्यात आली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक नीलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे, पोलीस अंमलदार आप्पासाहेब माळी करीत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : सिडको एन ७ मधील कुशल मॅटर्निटी होममध्ये डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसुतीनंतर विवाहितेचा मृत्‍यू, दोन्ही डॉक्‍टरांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest News

मोठी बातमी : सिडको एन ७ मधील कुशल मॅटर्निटी होममध्ये डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसुतीनंतर विवाहितेचा मृत्‍यू, दोन्ही डॉक्‍टरांविरुद्ध गुन्हा दाखल मोठी बातमी : सिडको एन ७ मधील कुशल मॅटर्निटी होममध्ये डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसुतीनंतर विवाहितेचा मृत्‍यू, दोन्ही डॉक्‍टरांविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सिडको एन ७ बजरंग चौकातील कुशल मॅटर्निटी होममध्ये २८ वर्षीय विवाहितेचा प्रसुती झाल्यानंतर डॉक्‍टरांनी केलेल्या...
मनपाच्या प्रभाग रचनेवर आक्षेपांचा पाऊस!, ४ दिवसांत १४ तक्रारी..., काय होताहेत आरोप जाणून घेऊ...
अगरबत्ती विक्री करताना संशयास्पद हालचाली, पोलिसांनी पकडले तर खिशात निघाला चोरीचा मोबाइल!, जवाहरनगर पोलिसांची कामगिरी
नवीन फोन खरेदी केल्यानंतरही कॉल हिस्ट्री होणार नाही डिलीट
बारावीच्या विद्यार्थ्यांना फिजिक्सची कन्सेप्ट क्लिअर करणे होणार सोपे; NCERT ने आणलाय मोफत ऑनलाइन कोर्स
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software