कीर्तनकार संगीताताई महाराज पवार यांच्या खूनप्रकरणात मोठी अपडेट : आश्रमातील सीसीटीव्ही फूटेजमध्ये आढळले २ चोर!

On

वैजापूर (गणेश म्‍हैसमाळे : सीएससीएन वृत्तसेवा) : चिंचडगाव (ता. वैजापूर) येथील सद्‌गुरू नारायणगिरी कन्या आश्रमात शुक्रवारी (२७ जून) रात्री चोरट्यांनी कीर्तनकार संगीताताई महाराज आण्णासाहेब पवार (वय ४५, रा. चिंचडगाव) यांचा खून केला. त्‍यांचे मारेकरी आता पोलिसांच्या दृष्टीक्षेपात आले आहेत. सोमवारी (३० जून) पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागले, ज्‍यात दोन चोरटे कैद झाले आहेत. त्‍यांचा शोध […]

वैजापूर (गणेश म्‍हैसमाळे : सीएससीएन वृत्तसेवा) : चिंचडगाव (ता. वैजापूर) येथील सद्‌गुरू नारायणगिरी कन्या आश्रमात शुक्रवारी (२७ जून) रात्री चोरट्यांनी कीर्तनकार संगीताताई महाराज आण्णासाहेब पवार (वय ४५, रा. चिंचडगाव) यांचा खून केला. त्‍यांचे मारेकरी आता पोलिसांच्या दृष्टीक्षेपात आले आहेत. सोमवारी (३० जून) पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागले, ज्‍यात दोन चोरटे कैद झाले आहेत. त्‍यांचा शोध आता पोलीस घेत आहेत.

या खुनाच्या घटनेचा तपास ३ पथके करत आहेत. सोमवारी त्‍यांना तपासाची दिशा मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी चौघांना ताब्‍यात घेऊन चौकशी केली होती. पण त्‍यांच्या चौकशीतून फारसे काही हाती लागले नाही. त्‍यामुळे आता सीसीटीव्ही फूटेजमध्ये आढळलेल्या दोघांना ताब्‍यात घेतल्यानंतर उलगडा होऊ शकतो, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आश्रमातील सीसीटीव्ही फूटेजमध्ये अंदाजे २० ते २५ वर्षे वयोगटातील दोन चोरटे दिसत आहे. ते एकमेकांशी हिंदीत बोलत आहेत. दोघांनी प्रारंभी आश्रमातील मोहटा देवी मंदिराचे गेट लोखंडी सळईने तोडण्याचा प्रयत्‍न केला. त्यातील एकाने सीसीटीव्ही पाहिल्यानंतर सळईने सीसीटीव्ही तोडले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

ऑगस्टमधील पहिला प्रदोष व्रत ६ की ७ ऑगस्टला? पूजा करण्याची तारीख, मंत्र आणि पद्धत जाणून घ्या

Latest News

ऑगस्टमधील पहिला प्रदोष व्रत ६ की ७ ऑगस्टला? पूजा करण्याची तारीख, मंत्र आणि पद्धत जाणून घ्या ऑगस्टमधील पहिला प्रदोष व्रत ६ की ७ ऑगस्टला? पूजा करण्याची तारीख, मंत्र आणि पद्धत जाणून घ्या
प्रदोष व्रत भगवान शिव यांना समर्पित आहे. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. मान्यतेनुसार, प्रदोष व्रत...
नागपंचमीला झोका खेळताना पडून शेतकऱ्याचा मृत्‍यू, पैठणची घटना
अनोळखी पुरुषाकडून लिफ्ट घेणे महिलेला पडले महागात, वाळूजजवळ काय घडलं...
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता
घरी बसून करा हजारो रुपयांचे मोफत फेशियल!; सगळे तुम्हाला विचारतील, तुमच्या चमकत्या त्वचेचे रहस्य काय?
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software