- Marathi News
- सिटी डायरी
- सेव्हल हिल्स- सुतगिरणी चौक- दर्गा चौक रस्त्यावरील मार्किंग पूर्ण, आज गाडे चौकापर्यंत मार्किंग करणा...
सेव्हल हिल्स- सुतगिरणी चौक- दर्गा चौक रस्त्यावरील मार्किंग पूर्ण, आज गाडे चौकापर्यंत मार्किंग करणार, हर्सूलमध्ये पक्की अतिक्रमणे केली जमीनदोस्त
On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सेव्हल हिल्स- सुतगिरणी चौक-शहानूरमियाँ दर्गा चौक या रस्त्यावर दोन्ही बाजूंच्या अतिक्रमणांवर महापालिकेच्या नगररचना विभागाच्या पथकाने बुधवारी (२३ जुलै) मार्किंग केली. अनेक ठिकाणी कुंपने, टीनशेड, पायऱ्या अतिक्रमणात आहेत. त्यांना स्वतःहून ते हटविण्याचे आदेश दिले आहेत. ९९ टक्के मालमत्ताधारकांनी बांधकाम परवानगी घेऊन ३० आणि २४ मीटरच्या पुढेच बांधकामे केल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.
हर्सूलमध्ये महापालिका शाळेजवळ ४ हजार चौरस फूट जागेवर असलेली पक्की अतिक्रमणे बुधवारी (२३ जुलै) पाडण्यात आली. अतिक्रमणधारकांनी आधीच सामान काढून ठेवले होते. महापालिकेच्या बुलडोझरने आरसीसीचे पक्के, तर काही कच्चे बांधकाम उद्ध्वस्त केले. ही कारवाई अतिक्रमण नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त अशोक गिरी, संजय सुरडकर, बांधकाम निरीक्षक सय्यद जमशेद, रवींद्र देसाई, सोमशंकर मेत्रे, नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव यांनी केली. या जागेवर महापालिकेकडून व्यायामशाळा बांधण्यात येणार आहे.
दरम्यान, आता पोलिसांनी बंदोबस्त दिला की महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथक कोणत्याही क्षणी हर्सूल रस्ता, नारेगाव रस्ता, सेव्हन हिल्स ते सूतगिरणी चौक, सूतगिरणी चौक ते आनंद गाडे चौक, गजानन महाराज मंदिर ते जयभवानीनगर चौक, चंपा चौक रस्ता, जटवाडा रोड, महावीर चौक ते दिल्ली गेट या रस्त्यांवरील अतिक्रमणांवर बुलडोझर चढवणार आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
25 Jul 2025 22:12:45
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : रस्त्याने एकट्याने जाणाऱ्यांना चाकूचा धाक दाखवून लुटायचे. सिडको एमआयडीसी, जवाहरनगर पोलीस ठाण्यात अनेकांना लुटल्यानंतर काल्डा...