सॅटर्डे टू संडे : छत्रपती संभाजीनगरात संततधार!, ४१ मि. मी. पावसाची नोंद, जायकवाडी ८० टक्‍क्‍यांवर, तर हर्सूल तलावही भरण्याच्या मार्गावर

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरात शनिवारी (२६ जुलै) सकाळी सुरू झालेला संततधार पाऊस किंचित उघडीप देत आज, २७ जुलैच्या सकाळपर्यंतही सुरूच आहे. या २४ तासांत ४१.४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. शनिवार अनेकांना घरातच काढावा लागला. सखल भागांत पाणी साचून नागरिकांचे हाल झाले.

महावितरणचा सावळा गोंधळ दिसून आला असून, सिडको, मुकुंदवाडी, सातारा-देवळाई, राजनगर, संजयनगर, छावणी, पिसादेवी रोडसह अनेक भागांतील वीजपुरवठा कित्‍येक तास बंद होता. त्‍यामुळे नागरिकांनी संताप व्यक्‍त केला. शिवाजीनगर येथील भुयारी मार्गावर पत्र्याचे छत बसविण्याचे काम शनिवारी सुरू करण्यात आले.

त्‍यामुळे भुयारी मार्ग बंद केल्याने वाहनधारकांना संग्रामनगर उड्डाणपुलावरून वळसा घालावा लागला. दर्गा चौकात वाहतुकीची कोंडी होत होती. ३१ जुलैपर्यंत हे काम चालणार आहे. शहरात सहा ठिकाणी झाडे कोसळली. अभिनय सिनेमागृह आणि सिडकोतील जयदुर्गा हौसिंग सोसायटीत पाणी साचले. अग्‍निशमन विभागाने वेळीच धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. याशिवाय शहरातील सखल भागांत २ फुटांपर्यंत पाणी साचले होते. या पावसामुळे हर्सूल तलावाची पाणीपातळी वाढली असून तलाव भरण्याच्या मार्गावर आहे.

जायकवाडी @८०%
पैठण येथील जायकवाडी धरण ८० टक्‍क्‍यांच्या वर भरले असून, कोणत्‍याही क्षणी गोदापात्रात पाणी सोडले जाऊ शकते. त्‍यामुळे मराठवाड्यातील ५ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळी सहाला १४ हजार ८०३ क्‍युसेक वेगाने धरणात पाणी येत होते. त्‍यामुळे पाणीपातळी ८०.७२ टक्‍क्‍यांवर गेली आहे. यंदाही धरण १०० टक्‍के भरण्याची शक्‍यता आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सेंट्रल नाक्‍याजवळील दोन दुकानांना भीषण आग, लाखोंचे नुकसान

Latest News

सेंट्रल नाक्‍याजवळील दोन दुकानांना भीषण आग, लाखोंचे नुकसान सेंट्रल नाक्‍याजवळील दोन दुकानांना भीषण आग, लाखोंचे नुकसान
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जिन्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सेंट्रल नाक्याजवळील व्हीआयपी फंक्शन हॉलसमोरील फर्निचर आणि फ्रिजच्या दुकानाला शुक्रवारी (१...
प्रेमप्रकरणातून तरुणाला बेदम मारहाण, तू तिला सोड, म्‍हणत लोखंडी पाइप डोक्‍यात घालून केले गंभीर जखमी!; ए.एस. क्‍लबजवळील घटना
पतीपासून विभक्‍त राहणाऱ्या तरुणीसोबत चर्चमध्ये ओळख, नंतर प्रेमासाठी हट्ट, पाठलाग अन्‌ माझ्यासोबत राहा म्‍हणून मारहाण!, बजाजनगरातील घटना
उस्मानपुऱ्यात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती मिरवणुकीत पोलिसांवर चाकूहल्ला, १ पोलीस जखमी
Full Story : वाळूज MIDC तील तिसगावमध्ये बनावट नोटांचा छापखाना उद्‌ध्वस्त, शाई, कागद, मशिनरीसह ८८ लाखांचा मुद्देमाल जप्त, ७ अटकेत, म्‍होरक्‍या अंबादास ससाणे फरारी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software