फिजिओथेरपीतज्‍ज्ञ म्हणाले, सोशल मीडियावर कावकाव थांबवून प्रत्यक्षात धावाधाव करा, आजार पळून जातील!, छ. संभाजीनगरात फिजिकॉम परिषद

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : सध्या प्रत्येकाच्या हाती मोबाईल आला आहे. जो तो या मोबाईलवर कावकाव करीत आहे, अशी चिंता व्यक्त करतानाच मोबाईलवर अशा हालचाली करण्यापेक्षा प्रत्यक्षात शारीरिक हालचाली केल्या तर उतारवयात होणारे आजार टळतील, असा सल्ला फिजिओथेरपी तज्‍ज्ञांनी एमजीएम फिजिकॉम - २०२५ या परिषदेत दिला. 

558101509_1377596860395117_50297 (1)

एमजीएम स्कूल ऑफ फिजिओथेरपी अँड एमजीएम इंस्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी यांच्या संयुक्त विद्यमानाने रुक्मिणी सभागृहात एमजीएम फिजिकॉम - २०२५चे शनिवार (११ ऑक्‍टोबर) व रविवारी (१२ ऑक्‍टोबर) आयोजन केले आहे. शनिवारी राज्याचे इतर मागास बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. आधुनिक काळात माणसाच्या हालचाली फक्त मोबाईलच्या माध्यमातून सोशल मीडियावरच वाढल्या आहेत. प्रत्यक्षात ही माणसे व्यायाम करून मात्र हालचाली करीत नाहीत. यामुळे उतारवयात होणारे आजार तरुणांना होत आहेत. ही गंभीर बाब आहे, अशी चिंता यावेळी तज्‍ज्ञांनी व्यक्त केली.

दोन दिवसांच्या या परिषदेच्या उद्‌घाटन समारंभप्रसंगी एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, एमजीएम इंस्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेसचे कुलगुरू डॉ. शशांक दळवी, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, सर्चचे सहसंचालक डॉ. आनंद बंग, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. अपर्णा कक्कड, कुलसचिव डॉ. आशीष गाडेकर, प्राचार्य डॉ. सरथ बाबू, प्राचार्य डॉ. रिंकल मलानी, संयोजक प्रेरणा दळवी आदी उपस्थित होते. या वेळी डॉ. सौरभ शर्मा, डॉ. करेन फिट, डॉ. सिंथिया स्त्रीकेसावन आदी तज्‍ज्ञांनी मार्गदर्शन केले. फिजिओथेरपी ही काळाची गरज असल्याचे या वेळी सावे यांनी सांगितले. तर आरोग्य चांगले ठेवायचे तर माफक तरी व्यायाम करणे आवश्यक असल्याचा सल्ला कदम यांनी यावेळी दिला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!

Latest News

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले! विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विट्स हॉटेल चौकातून देवगिरी कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर लुटारू सापळा लावून थांबलेले असतात. एकटेदुकटे कुणी...
UPSC मध्ये नवीन भरती सुरू, २ लाख रुपयांपर्यंत पगार, नोकऱ्यांसाठी पात्रता जाणून घ्या...
CUET PG करिता रजिस्ट्रेशन सुरू, परीक्षा मार्चमध्ये होणार, या गोष्टी लक्षात ठेवा...
१७,००० रुपयांच्या नोकरीवर मारली लाथ, आता वर्षाकाठी १७ लाखांची करताहेत उलाढाल!
३ दिवसांपासून पोटात अन्न-पाण्याचा कण नाही, वडगाव कोल्हाटीत उपोषणकर्त्या महिलांची प्रकृती बिघडली, डॉक्टर म्हणाले, उद्या आणखी बिकट होईल स्थिती...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software