ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसी परिसरातील वडगाव कोल्हाटीतील गट नं. ९ मधील रहिवासी अनेक वर्षांपासून मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. पाणी, रस्‍ता, ड्रेनेज सुविधा या मुलभूत सुविधा देण्यास ग्रामपंचायत प्रशासन अपयशी ठरल्याने आता महिलांच्या संयमाचा बांध फुटला आहे. उद्या, ११ डिसेंबरला त्या उपोषणाला बसणार असून, आज, १० ऑक्‍टोबरला सकाळी सर्व महिलांनी एकत्र येऊन रस्‍त्‍यावर साचलेल्या सांडपाण्याला प्रशासनाचे नाव देऊन श्रद्धांजली वाहत संताप व्यक्त केला.

नागरिकांनी ग्रामपंचायत व संबंधित यंत्रणांना वेळोवेळी निवेदने दिली आहेत. अखेर आता ११ डिसेंबरला सकाळी ११ वाजता बेमुदत उपोषण सुरू करण्यात येणार आहे. ज्योती कांबळे यांच्या नेतृत्त्वात होणाऱ्या आंदोलनात सीमा पायघोन, अश्विनी भालेकर, ज्योती चव्हाण, प्रमिला मस्के, रत्ना पवार, अश्विनी बासवडे, ज्योती कल्याणकर, कावेरी फुले, हेमलता रंगारे, प्रिती सवई, आरती उगले, कोमल देशमुख, चंदा बनकर, वैशाली धसकट, शीतल पवार, जयश्री बेंद्रे, वैशाली राजपूत, छाया वाघ, गंगुबाई तांगडे, कविता आदाने, वंदना मुळे, अलका काळे, मीना दौड या महिलांचा सहभाग असणार आहे. गेल्या वर्षीही महिलांनी उपोषण केले होते. त्यावेळी एका उपोषणार्थी महिलेची प्रकृती धोक्यात आल्याने ग्रामपंचायतीच्या आश्वासनामुळे उपोषण मागे घेण्यात आले होते. मात्र आश्वासनाची पूर्तता ग्रामपंचायत व राजकारण्यांनी केली नाही. आश्वासने नको, सुविधा द्या, अशी भूमिका आता महिलांनी घेतली आहे. रोज शेकडो नागरिक, महिलांसह मुलेदेखील उपोषणाला  बसणार आहेत. महिलांनी इशारा दिला आहे की, या वेळी जोपर्यंत प्रशासन जागं होत नाही आणि मूलभूत सुविधा उपलब्ध होत नाहीत, तोपर्यंत उपोषण कोणत्याही परिस्थितीत मागे घेतले जाणार नाही.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ

Latest News

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहर व जिल्ह्यात मुस्लिम बांधवांची संख्या मोठी आहे. मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मास म्हणून ओळखल्या...
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
जमिनीच्या वादातून सेवानिवृत्त वनअधिकाऱ्याचे भरदिवसा अपहरण करून लुटले, ७ तास धरले वेठीस, छत्रपती संभाजीनगरची खळबळजनक घटना
सिल्लोडजवळ २ भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला मागून धडक, एकाचा मृत्‍यू; मका नेणारा ट्रक उलटून चालक जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software