हर्सूलमध्ये सोमवारी सकाळी १० लाच १५ जेसीबी, १५ टिप्पर, ४ पोकलेन घेऊन धडणार मनपाचे पथक!

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : हर्सूलमध्ये सोमवारी (२८ जुलै) सकाळी दहापासून महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथक रस्ता रूंदीकरणात बाधित होणाऱ्या १५० मालमत्तांची पाडापाडी सुरू करणार आहे.  दीड वर्षापूर्वी जी-२० परिषदेपूर्वी अजिंठा रस्त्यासाठी हर्सूल गावात १०० फूट रस्ता रूंद केला होता, आता उर्वरित १०० फूट रस्ता रूंद करण्यात येत आहे.

१५ जेसीबी, १५ टिप्पर, ४ पोकलेन, अग्निशमन, कोंडवाडा आणि विद्युत विभागाची हायड्रोलिक वाहनांच्या लावाजाम्यासह महापालिकेचे पथक हर्सूलमध्ये धडकणार आहे. यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त राहणार आहे. १५ दिवसांपूर्वीच महापालिकेने हर्सूलमध्ये भोंगा फिरवून मालमत्ता काढून घेण्याचे आवाहन केले होते. सोमवारी सकाळी १० ला हर्सूल टी पॉइंटपासून मालमत्तांवर बुलडोझर चालायला सुरुवात होईल. हर्सूल पाझर तलावापर्यंत कारवाई केली जाणार आहे. महापालिकेने किमान २५० अधिकारी, कर्मचारी राहणार असून, पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटाही तैनात असणार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

डिजिटल अरेस्ट रॅकेट छत्रपती संभाजीनगरातून?; तामिळनाडूच्या पोलिसांनी वाळूज MIDC तून दोघांना केली अटक

Latest News

डिजिटल अरेस्ट रॅकेट छत्रपती संभाजीनगरातून?; तामिळनाडूच्या पोलिसांनी वाळूज MIDC तून दोघांना केली अटक डिजिटल अरेस्ट रॅकेट छत्रपती संभाजीनगरातून?; तामिळनाडूच्या पोलिसांनी वाळूज MIDC तून दोघांना केली अटक
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सध्या देशात डिजिटल अरेस्ट हे सायबर भामट्यांचे कुटील कारस्थान चर्चेत आहे. छत्रपती संभाजीनगरातही अनेकांना या...
सेंट्रल नाक्‍याजवळील दोन दुकानांना भीषण आग, लाखोंचे नुकसान
प्रेमप्रकरणातून तरुणाला बेदम मारहाण, तू तिला सोड, म्‍हणत लोखंडी पाइप डोक्‍यात घालून केले गंभीर जखमी!; ए.एस. क्‍लबजवळील घटना
पतीपासून विभक्‍त राहणाऱ्या तरुणीसोबत चर्चमध्ये ओळख, नंतर प्रेमासाठी हट्ट, पाठलाग अन्‌ माझ्यासोबत राहा म्‍हणून मारहाण!, बजाजनगरातील घटना
उस्मानपुऱ्यात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती मिरवणुकीत पोलिसांवर चाकूहल्ला, १ पोलीस जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software