छत्रपती संभाजीनगरातील रिक्षाचालकांना होणार धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचा लाभ, काय आहेत नियम जाणून घेऊ...

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जिल्ह्यातील ६५ वर्षांवरील पात्र ऑटोरिक्षा व मीटर टॅक्सी परवानाधारक चालकांसाठी महाराष्ट्र शासनाने धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. पात्र चालकांनी लवकरात लवकर नोंदणी करून या कल्याणकारी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

ॲटोरिक्षा व मीटर टॅक्सी परवानाधारक चालक यांनी http://ananddighekalyankarimandal.org या संकेतस्थळावर नोंदणी करावी. परवानाधारक चालक महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे परवानाधारकांकडे ५ वर्षे जुना परवाना असावा व त्यांच्याकडे ऑटोरिक्षा व मीटर टॅक्सी वगळता त्यांच्याकडे कोणतेही चारचाकी वान नसावे. असे पात्र परवानाधारक चालक आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून दिलेल्या संकेतस्थळावर दिलेले शुल्क जमा करुन पावती स्वत: कडे ठेवण्यात यावी. परवानाधारक चालक यांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO OFFICE) येथे संपर्क करू शकतात. प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी सर्व पात्र चालकांनी लवकरात लवकर नोंदणी करून या कल्याणकारी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे

आणखी महत्त्वाच्या बातम्या

लिफ्ट दिली, चाऊस कॉलनीत नेले, चाकूने भोसकले, पेरू विक्रेता गंभीर जखमी

Latest News

लिफ्ट दिली, चाऊस कॉलनीत नेले, चाकूने भोसकले, पेरू विक्रेता गंभीर जखमी लिफ्ट दिली, चाऊस कॉलनीत नेले, चाकूने भोसकले, पेरू विक्रेता गंभीर जखमी
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीवर बसवून तिघांनी पेरू विक्रेत्‍याला चाऊस कॉलनीत नेले. तिथे मारहाण करत चाकूने...
संशयावरून पोलिसांनी मोटारसायकल पकडली, निघाला साराच घोळ!; मछली खडक येथील घटना
ड्रग्‍जमाफिया अजय ठाकूरने भरकोर्टात सहायक फौजदाराच्या छातीत मारली लाथ!, छ. संभाजीनगरातील घटनेने पुन्हा पोलिसांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
स्वागतार्ह बदल : मनसैनिकांना मारहाण झाल्याने करोडी टोलनाक्‍याविरुद्ध मनसे पदाधिकारी पोलीस आयुक्‍तांना भेटले
छ. संभाजीनगरात महसूल सप्ताहाचा समारोप; स्वतःचे ज्ञान अद्ययावत करून लोकांना सेवा द्या : जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software