७००० विद्यार्थ्यांसाठी छ. संभाजीनगरात होणार कौशल्य विकास केंद्र, टाटा संस्थेचे सहकार्य घेणार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : टाटा संस्थेच्या सहयोगातून ७००० विद्यार्थी शिकू शकतील असे कौशल्य विकास केंद्र छत्रपती संभाजीनगर येथे सुरू करण्याबाबतही उद्योग विभाग प्रयत्नशील असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी (२५ सप्टेंबर) येथे दिली.

अतिवृष्टीमुळे औद्योगिक वसाहतीच्या संलग्न भागात गावात, शेतात पाणी शिरल्याचे प्रकार घडले. ते भविष्यात घडू नये यासाठी तात्काळ उपाययोजना राबवा. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी सविस्तर प्रस्ताव सादर करा, असे निर्देश मंत्री सामंत यांनी दिले. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील औद्योगिक क्षेत्रात व औद्योगिक क्षेत्रामुळे संलग्न भागात पाणी जाऊन झालेल्या नुकसानीचा आढावा मंत्री सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला.

आ. विलास भुमरे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्यअभियंता बाळासाहेब झांजे, कार्यकारी अभियंता छत्रपती संभाजीनगरचे आर. डी. गिरी, लातूरचे अभय नवधने, जालन्याचे बाळू राऊतराय, धाराशिवचे प्रमोद मगरे, रवींद्र चौधरी, ऑरिक सिटीचे अरुणकुमार दुबे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक छत्रपती संभाजीनगरचे स्वप्निल राठोड, जालन्याचे योगेश सारणेकर, बीडचे किरण जाधव तसेच उद्योग संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

कामगार चौक ते आंबेडकर चौक या रस्त्यासाठी १६ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. रांजणगाव शेणपुंजी येथे ६०० मीटर रस्ता खराब असून त्याबाबत ग्रामस्थांची मागणी आहे. ही समस्या तात्काळ निकाली काढावी, असे निर्देश सामंत यांनी दिले. वाळूज एमआयडीसीतील साजापूर रस्त्यालाही मंजुरी देण्यात आली. औद्योगिक वसाहतीतून संलग्न भागात जाणारे पावसाचे पाणी तात्काळ वळविण्याचे निर्देशही देण्यात आले. औद्योगिक वसाहतींचा काही ठिकाणी खंडीत झालेला वीज पुरवठा पूर्ववत सुरू झाल्याची माहितीही या वेळी देण्यात आली. वाळूज एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बदलणे आवश्यक असून त्यासाठी सिडकोसोबत हे काम करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले. 

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मंदिरात गुप्तपणे दान करा ‘या’ ५ गोष्टी‌! तुमची संपत्ती वाढते...

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software