CSCN ने बातमी प्रसिद्ध करताच आ. अनुराधा चव्हाण शेतकऱ्यांच्या उपोषणस्थळी, जिल्हाधिकाऱ्यांकडून ठोस आश्वासन, शेतकऱ्यांनी सोडले उपोषण

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कडाक्‍याच्या थंडीतही शेतकऱ्यांचे उपोषण गेल्या ५ दिवसांपासून सुरू असल्याचे वृत्त आज, १७ जानेवारीला छत्रपती संभाजीनगर सिटी न्‍यूजने प्रसिद्ध करताच वृत्ताची दखल घेत आ. अनुराधा चव्हाण या तातडीने शेतकऱ्यांच्या उपोषणस्थळी धावल्या. त्‍यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क केल्यानंतर, जिल्हाधिकाऱ्यांनी मागणीच्या पूर्ततेचे ठोस आश्वासन दिले. त्‍यानंतर आ. चव्हाण यांच्या हस्ते शेतकऱ्यांनी उपोषण सोडले. काय आहे […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कडाक्‍याच्या थंडीतही शेतकऱ्यांचे उपोषण गेल्या ५ दिवसांपासून सुरू असल्याचे वृत्त आज, १७ जानेवारीला छत्रपती संभाजीनगर सिटी न्‍यूजने प्रसिद्ध करताच वृत्ताची दखल घेत आ. अनुराधा चव्हाण या तातडीने शेतकऱ्यांच्या उपोषणस्थळी धावल्या. त्‍यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क केल्यानंतर, जिल्हाधिकाऱ्यांनी मागणीच्या पूर्ततेचे ठोस आश्वासन दिले. त्‍यानंतर आ. चव्हाण यांच्या हस्ते शेतकऱ्यांनी उपोषण सोडले.

काय आहे प्रकरण…
अधिकाऱ्यांना हाताशी धरून नियमात नसतानाही गौणखनिज उत्‍खननाची दोघांनी परवानगी मिळवल्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे जनजीवन धोक्‍यात आले आहे. त्‍यामुळे आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी विभागीय आयुक्‍तालयासमोर १३ जानेवारीपासून उपोषण सुरू केले होते. कडाक्‍याच्या थंडीत सुरू असलेल्या आंदोलनाची दखल प्रशासनाने घेतली नसल्याने संताप व्यक्‍त होत होता. याबद्दलचे वृत्त आज छत्रपती संभाजीनगर सिटी न्‍यूजने प्रसिद्ध केले होते.

काय आहे मागणी…
हर्सूल सावंगीजवळील नायगाव भिकापूर (ता. छत्रपती संभाजीनगर) येथील सरकारी जमीन गट नं. १०७ मध्ये कुंजू मोहम्मद इब्राहिम (दिशा एंटरप्रायजेस) आणि मो. अली इम्रान खान जब्बारखान (रिलायबल स्टोन इंडस्ट्रीज) या गौण खनिज चालकांनी अवैधरित्या मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन सुरू केले. नियमापेक्षा जास्त उत्खनन केले असून, समृध्द महामार्ग जवळ असल्यामुळे त्यांना बोअर ब्लास्ट करून गौण खनिज काढता येत नाही. त्यामुळे त्यांनी काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून या गटामध्ये गौण खनिज उत्खनन करण्यासाठी नवीन परवानगी मिळवलेली आहे. मात्र या गटाला लागून आम्ही ५० ते ६० शेतकरी शेती करून उपजिवीका भागवित आहेत. त्याचप्रमाणे आमच्याकडे मोठ्या प्रमाणात पाळीव जनावरे असून, या डोंगरावर आमची जनावरे चरतात. हाकेच्या अंतरावर आमची वस्ती आहे. या खदानी चालू झाल्या तर बोअर ब्लास्ट व वाहनाच्या धुळीमुळे आमच्या व जनावरांच्या जिवाला व आमच्या शेतीला धोका निर्माण होऊन आम्ही बेघर, बेरोजगार होण्याची भीती आहे. त्‍यामुळे या गटात दिलेली गौण खनिज परवानगी रद्द करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी करत उपोषण सुरू केले होते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

ऑगस्टमधील पहिला प्रदोष व्रत ६ की ७ ऑगस्टला? पूजा करण्याची तारीख, मंत्र आणि पद्धत जाणून घ्या

Latest News

ऑगस्टमधील पहिला प्रदोष व्रत ६ की ७ ऑगस्टला? पूजा करण्याची तारीख, मंत्र आणि पद्धत जाणून घ्या ऑगस्टमधील पहिला प्रदोष व्रत ६ की ७ ऑगस्टला? पूजा करण्याची तारीख, मंत्र आणि पद्धत जाणून घ्या
प्रदोष व्रत भगवान शिव यांना समर्पित आहे. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. मान्यतेनुसार, प्रदोष व्रत...
नागपंचमीला झोका खेळताना पडून शेतकऱ्याचा मृत्‍यू, पैठणची घटना
अनोळखी पुरुषाकडून लिफ्ट घेणे महिलेला पडले महागात, वाळूजजवळ काय घडलं...
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता
घरी बसून करा हजारो रुपयांचे मोफत फेशियल!; सगळे तुम्हाला विचारतील, तुमच्या चमकत्या त्वचेचे रहस्य काय?
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software