छत्रपती संभाजीनगरला श्रावण पावला!; १५ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद, पिकांना संजीवनी, पण कन्‍नड, खुलताबाद पट्ट्यात नुकसान

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाने जोरदार कमबॅक केले. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना चिंब झाले असून, ४४ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पैकी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १५ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली आहे.

जिल्ह्यात गुरुवार ते शनिवार असा सलग तीन दिवस जोरदार पाऊस झाला. फुलंब्री, कन्नड, खुलताबाद तालुक्यात पावसाने नुकसान केले आहे. जमिनी खरडल्या गेल्या, नळकांडी पूल वाहू गेल्याच्या बातम्या आहेत. कन्नड तालुक्यात कन्नड- चिकलठाण राज्य मार्गावरील गांधारी नदीवरील पूल वाहून गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. चिकलठाण-वढाळी खोकरी नाल्यावरील पूलही वाहून गेला. दोन्ही बाजूंनी मुख्य रस्ते बंद झाल्याने चिकलठाण ग्रामस्थ गावातच अडकले आहेत. .

फुलंब्री तालुक्यातील डोंगरगाव शिव शिवारातील दीपलाल राजाराम जंधाळे आणि मदन राजाराम जंघाळे या दोन भावांच्या घरांच्या भिंती शनिवारी रात्री पडल्याने संसारोपयोगी साहित्य भिजून खराब झाले. सिल्लोड तालुक्‍यात नुकसानीची माहिती नाही. पिकांना पावसामुळे नवसंजीवनी मिळाली आहे. तालुक्‍यात नदी-नाले पुन्हा वाहू लागले आहेत. धरणांत अपेक्षित पाणीसाठा नसल्याने मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. खुलताबाद तालुक्‍यात बाजारसावंगी, वेरूळ, सुलतानपूर, गल्लेबोरगाव, कसाबखेड्यात पावसाने शेतीपिकाचे नुकसान केले आहे. फुलमस्ता, सोबलगाव, बोडखा येथील नद्यांना पूर आला. दरेगावच्या भास्कर गायकवाड यांचा एक बैल व गाय पुरात वाहून गेली.

जायकवाडी @ ८३
पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाचा जलसाठा ८३ टक्क्यांवर पोहोचला आहे. जायकवाडीच्या उर्ध्वभागात असाच पाऊस सुरू राहिल्यास पुढील ८ते १० दिवसांत जायकवाडी धरण शंभर टक्के भरेल.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

डिजिटल अरेस्ट रॅकेट छत्रपती संभाजीनगरातून?; तामिळनाडूच्या पोलिसांनी वाळूज MIDC तून दोघांना केली अटक

Latest News

डिजिटल अरेस्ट रॅकेट छत्रपती संभाजीनगरातून?; तामिळनाडूच्या पोलिसांनी वाळूज MIDC तून दोघांना केली अटक डिजिटल अरेस्ट रॅकेट छत्रपती संभाजीनगरातून?; तामिळनाडूच्या पोलिसांनी वाळूज MIDC तून दोघांना केली अटक
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सध्या देशात डिजिटल अरेस्ट हे सायबर भामट्यांचे कुटील कारस्थान चर्चेत आहे. छत्रपती संभाजीनगरातही अनेकांना या...
सेंट्रल नाक्‍याजवळील दोन दुकानांना भीषण आग, लाखोंचे नुकसान
प्रेमप्रकरणातून तरुणाला बेदम मारहाण, तू तिला सोड, म्‍हणत लोखंडी पाइप डोक्‍यात घालून केले गंभीर जखमी!; ए.एस. क्‍लबजवळील घटना
पतीपासून विभक्‍त राहणाऱ्या तरुणीसोबत चर्चमध्ये ओळख, नंतर प्रेमासाठी हट्ट, पाठलाग अन्‌ माझ्यासोबत राहा म्‍हणून मारहाण!, बजाजनगरातील घटना
उस्मानपुऱ्यात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती मिरवणुकीत पोलिसांवर चाकूहल्ला, १ पोलीस जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software