मिनी ट्रॅक्टरसाठी छत्रपती संभाजीनगरच्या बचतगटांना अर्ज करण्याचे आवाहन

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना ९० टक्‍के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना राबविण्यात येते. योजनेअंतर्गत ३ लाख ५० हजार रुपये मर्यादेत मिनी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी ९० टक्‍के अनुदान देण्यात येते. उर्वरित १० टक्‍के रक्कम संबंधित बचत गटाने भरावयाचे आहे. […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना ९० टक्‍के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना राबविण्यात येते. योजनेअंतर्गत ३ लाख ५० हजार रुपये मर्यादेत मिनी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी ९० टक्‍के अनुदान देण्यात येते. उर्वरित १० टक्‍के रक्कम संबंधित बचत गटाने भरावयाचे आहे.

योजनेच्या लाभ मिळण्यासाठी योजनेच्या अटी व शर्ती अशा :
-अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत.
-स्वयंसहाय्यता बचत गटातील सर्व सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील असावेत.
-स्वयंहाय्यता बचत गटाचे अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील असावेत.
-मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा ३ लाख ५० हजार रुपये इतकी राहील. स्वयंसहाय्यता बचत गटांनी वरील कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या किंवा प्रत्यक्ष साधनांच्या किंमतीच्या १० टक्‍के स्वहिस्सा भरल्यानंतर प्रत्यक्ष किंमतीच्या ९० टक्‍के अनुदान अनुज्ञेय राहील.
-लाभार्थी स्वयंसहाय्यता बचत गटांनी या योजनेअंतर्गत अनुज्ञेय असलेल्या किमान ९ ते १८ अश्वशक्तीपेक्षा जादा अश्वशक्तीचा ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करता येईल. मात्र त्याची या योजनेअंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अनुदानापेक्षा जास्तीची रक्कम संबंधित बचतगटाने स्वत: खर्च करणे आवश्यक राहील.
इच्छुक अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या इच्छुक स्वयंसहाय्यता बचतगटांनी आवश्यक कागदपत्रांसह ३१ जानेवारी २०२५ पूर्वी सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयाकडे अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त (समाजकल्याण) प्रदीप वेणू, मुरलीधर भोगले यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर

Latest News

चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. जुलै महिन्याचा हप्ता खात्यात जमा झाल्याचा संदेश लवकरच त्यांच्या...
जायकवाडी धरण तुडूंब भरताच विसर्ग सुरू, जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन
मॅरिड असूनही प्रेमाचा अट्टहास, तिला पती सोडायला लावून दुसरे लग्‍न केले, आता तिला एकीकडे म्हणतो ‘फालतू’; दुसरीकडे सांगतो, माझे अनेकींशी लफडे!!; लासूरस्टेशनच्या ३१ वर्षीय युवतीची पोलिसांत तक्रार
ऑगस्टमधील पहिला प्रदोष व्रत ६ की ७ ऑगस्टला? पूजा करण्याची तारीख, मंत्र आणि पद्धत जाणून घ्या
नागपंचमीला झोका खेळताना पडून शेतकऱ्याचा मृत्‍यू, पैठणची घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software