महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्यपरीक्षा रविवारी

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांच्यामार्फत महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा-२०२४ रविवारी (२९ जून) होणार आहे. ही परीक्षा सकाळी ११ ते १२ व दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत अशा दोन सत्रांत होणार आहे. छत्रपती संभाजीनगर या जिल्हा केंद्रावर एकूण ४ केंद्रांवर ९८४ परीक्षार्थींची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षेसाठी एकूण […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांच्यामार्फत महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा-२०२४ रविवारी (२९ जून) होणार आहे. ही परीक्षा सकाळी ११ ते १२ व दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत अशा दोन सत्रांत होणार आहे. छत्रपती संभाजीनगर या जिल्हा केंद्रावर एकूण ४ केंद्रांवर ९८४ परीक्षार्थींची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षेसाठी एकूण १२८ अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीमती संगिता राठोड यांनी कळविले आहे.

परीक्षा केंद्रांची यादी
१. विवेकानंद कला व सरदार दिलिपसिंह वाणिज्य महाविद्यालय, समर्थनगर, छत्रपती संभाजीनगर -(२४० उमेदवार)
२. विवेकानंद विज्ञान महाविद्यालय, समर्थनगर, छत्रपती संभाजीनगर -(२४०उमेदवार )
३. शासकीय तंत्रनिकेतन,महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर-(२८८ उमेदवार )
४. शासकीय कला व विज्ञान महाविद्यालय, सुभेदारी गेस्ट हाऊस जवळ विश्वास नगर छत्रपती संभाजीनगर-(२१६उमेदवार)
परीक्षार्थींसाठी सूचना
१. परीक्षेस येताना उमेदवाराने ओळखीच्‍या पुराव्‍यासाठी स्वत:चे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्ट कार्ड इत्यादी प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.
२. परीक्षेच्या वेळी कक्षात प्रवेशप्रमाणपत्र, काळ्या व निळ्या शाईचे बॉलपॉइंट पेन, ओळखपत्र व ओळखपत्राची छायांकीत प्रत या व्यतिरिक्त अन्य कोणतेही साहित्य अथवा वस्तु परीक्षा कक्षामध्ये घेऊन जाण्यास उमेदवारास परवानगी असणार नाही.
३. उमेदवारास त्याच्यासोबत डिजीटल डायरी, मायक्रोफोन, मोबाईल, ब्लुटुथ, कॅमेरा,फोन किंवा तत्सम कोणतेही संदेशवहन उपकरण, इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षा कक्षामध्ये घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. असे साहित्य आणले तर उमेदवारांना स्वत:च्या जबाबदारीवर परीक्षा केद्रांच्या आवाराच्या मुख्य दरवाजाबाहेरच ठेवावे लागेल. तसेच असे साहित्य ठेवण्याची जबाबदारी आयोगाची असणार नाही. परीक्षा केंद्राच्या आवाराच्या मुख्य दरवाजाच्या आत असे साहित्य आणल्यास उमेदवारांवर फौजदारी व प्रशासकीय कारवाईसह त्यांना आयोगाच्या आगामी परिक्षांकरिता बंदी घालण्यात येईल.
४.सुधारित कार्यपद्धतीनुसार प्रत्‍यक्ष परीक्षा सुरू होण्‍याच्‍या दीड तास अगोदर उमेदवारांना प्रवेश देण्यात येऊन अर्धा तास अगोदर परीक्षा इमारतीचे मुख्यद्वार बंद करण्यात येणार आहे.
५.परीक्षा कक्षात शेवटच्‍या प्रवेशासाठी निर्धारीत केलेल्‍या वेळेनंतर आलेल्‍या उमेदवारास कोणत्‍याही परिस्थितीत परीक्षेसाठी प्रवेश देण्‍यात येणार नाही.
६.परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरिता आयोगाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरिता जिल्हाधिकारी स्वत: लक्ष ठेवणार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर

Latest News

चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. जुलै महिन्याचा हप्ता खात्यात जमा झाल्याचा संदेश लवकरच त्यांच्या...
जायकवाडी धरण तुडूंब भरताच विसर्ग सुरू, जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन
मॅरिड असूनही प्रेमाचा अट्टहास, तिला पती सोडायला लावून दुसरे लग्‍न केले, आता तिला एकीकडे म्हणतो ‘फालतू’; दुसरीकडे सांगतो, माझे अनेकींशी लफडे!!; लासूरस्टेशनच्या ३१ वर्षीय युवतीची पोलिसांत तक्रार
ऑगस्टमधील पहिला प्रदोष व्रत ६ की ७ ऑगस्टला? पूजा करण्याची तारीख, मंत्र आणि पद्धत जाणून घ्या
नागपंचमीला झोका खेळताना पडून शेतकऱ्याचा मृत्‍यू, पैठणची घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software