महत्त्वाची बातमी : छ. संभाजीनगरात वाहनांना आता हायसिक्‍युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवणे अनिवार्य!

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ५० नुसार वाहनांस HSRP (High Security Registration Plates) बसविण्याची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व वाहनाधारकांना त्यांच्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसविण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी सूचना जारी केल्या आहेत. वाहनांना नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे, […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ५० नुसार वाहनांस HSRP (High Security Registration Plates) बसविण्याची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व वाहनाधारकांना त्यांच्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसविण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी सूचना जारी केल्या आहेत.

वाहनांना नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना HSRP आवश्यक असून सर्वोच्च न्यायालयाने तसे निर्देशही देण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी M/s Real Mazon India Ltd ही एजन्सी निश्चित करण्यात आलेली असून HSRP नंबर प्लेट बसविण्याकरीता बुकींग पोर्टल https://maharashtrahsrp.com हे निश्चित करण्यात आले आहे. वाहनधारकांनी या पोर्टलवर बुकींग करून त्यांच्या सोयीप्रमाणे वेळ घेऊन HSRP बसवून घेण्यात यावी. वाहनधारक जिल्ह्यातील कार्यालयातील नोंदणी धारक नसला तरी काही कामानिमित्त जिल्ह्यात वाहनधारक वाहन वापरत असेल तरीदेखील या वाहनास HSRP नंबर प्लेट बसविणे आवश्यक आहे.

HSRP नंबर प्लेट बसविण्यासाठी पुढीलप्रमाणे शुल्क जीएसटी वगळून आकारण्यात येणार आहे. दुचाकी / ट्रॅक्टर शुल्क ४५० रुपये, तीन चाकी ५०० रुपये, इतर सर्व वाहने ७४५ रुपये. वाहनधारकांना त्यांच्या वाहनावर HSRP नंबरप्लेट बसविण्या संदर्भात काही तक्रार असल्यास संबंधित सेवापुरवठा धारकाच्या पोर्टलवर तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे तक्रार दाखल करू शकतात. जिल्ह्यातील नागरिकांना सूचित करण्यात येते की, त्यांच्या वाहनावर HSRP नंबरप्लेट न बसवल्यास वाहनाचे मालकी हस्तांतरण, पत्ता बदल, वित्त बोजा चढविणे व उतरविणे दुय्यम प्रत, विमा अद्ययावत करणे आदी कामकाज थांबविण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी कळविले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर

Latest News

चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. जुलै महिन्याचा हप्ता खात्यात जमा झाल्याचा संदेश लवकरच त्यांच्या...
जायकवाडी धरण तुडूंब भरताच विसर्ग सुरू, जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन
मॅरिड असूनही प्रेमाचा अट्टहास, तिला पती सोडायला लावून दुसरे लग्‍न केले, आता तिला एकीकडे म्हणतो ‘फालतू’; दुसरीकडे सांगतो, माझे अनेकींशी लफडे!!; लासूरस्टेशनच्या ३१ वर्षीय युवतीची पोलिसांत तक्रार
ऑगस्टमधील पहिला प्रदोष व्रत ६ की ७ ऑगस्टला? पूजा करण्याची तारीख, मंत्र आणि पद्धत जाणून घ्या
नागपंचमीला झोका खेळताना पडून शेतकऱ्याचा मृत्‍यू, पैठणची घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software