- Marathi News
- सिटी डायरी
- छत्रपती संभाजीनगरसाठी बोअरवेल्ससंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी
छत्रपती संभाजीनगरसाठी बोअरवेल्ससंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी
On
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : संचालक आपत्ती व्यवस्थापन प्रभाग व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद दलाच्या निर्देशानुसार बोअरवेल्स संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यासंदर्भात वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्व्हेक्षण विभाग यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केल्याचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. यासंदर्भात जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना अशा :-उघड्या बोअरवेलना सिल करणे अनिवार्य, जेणेकरून […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : संचालक आपत्ती व्यवस्थापन प्रभाग व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद दलाच्या निर्देशानुसार बोअरवेल्स संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यासंदर्भात वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्व्हेक्षण विभाग यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केल्याचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.
-उघड्या बोअरवेलना सिल करणे अनिवार्य, जेणेकरून त्याठिकाणी जाण्यास मज्जाव होईल. यासाठी संबंधित जमीन मालक आणि ड्रिलिंग एजन्सी यांची जबाबदारी निश्चित करावी.
-सर्व बोअरवेल्स यांच्या नोंदणीची प्रणाली स्थापन करणे.
-उघड्या बोअरवेल संबंधी असलेली जोखीम व लहान मुलांची सुरक्षा याबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबविणे.
-बोअरवेल ऑपरेटर्स किंवा जमीन मालक यांनी बोअरवेलच्या सभोवताली सुरक्षेच्या अनुषंगाने अडथळे निर्माण करणे.
-असुरक्षित बोअरवेल ओळखण्यासाठी व त्यासंबंधी निराकरण करण्यासाठी समुदाय संचलित यंत्रणा कार्यान्वित करणे.
-सर्वोच्च न्यायालय यांनी जारी केल्याप्रमाणे बोअरवेल सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधिताकडून कठोर दंड आकारणी करणे.
-सुरक्षा नियमांचे पालन होते किंवा कसे याबाबत खात्री करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची नियमित तपासणी करणे.
-संबंधित अधिकाऱ्यांनी सुरक्षा नियमांचे पालन होत आहे याबाबतची खातरजमा करण्यासाठी नियमित तपासणी करणे.
-या सूचनांची व आदेशाची अवज्ञा झाल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ अन्वये कोणतीही व्यक्ती संस्था, अथवा समूह यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विनोद खिरोळकर यांनी कळविले आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
नागपंचमीला झोका खेळताना पडून शेतकऱ्याचा मृत्यू, पैठणची घटना
By City News Desk
अनोळखी पुरुषाकडून लिफ्ट घेणे महिलेला पडले महागात, वाळूजजवळ काय घडलं...
By City News Desk
Feature : अतिसारामुळे शरीर कमकुवत? आयुर्वेदिक उपायाने लगेच मिळेल आराम!
By City News Desk
Latest News
31 Jul 2025 19:19:25
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. जुलै महिन्याचा हप्ता खात्यात जमा झाल्याचा संदेश लवकरच त्यांच्या...