छत्रपती संभाजीनगरात चोरट्यांनीही साजरी केली ‘दिवाळी'!; एकीची सोनसाखळी तर दुसरीचे मंगळसूत्र हिसकावले!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात खरेदीची धूम सुरू असताना त्याच वेळी चोर, लुटारूंच्या टोळ्यांनी खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. ऐन दिवाळीत शहरात सोनसाखळी, मंगळसूत्र चोरीच्या आणखी दोन घटनांत महिला टार्गेट ठरल्या आहेत.

रविवारी (१९ ऑक्‍टोबर) सायंकाळी मीना देसाई या ७१ वर्षीय आजी दशमेशनगरमध्ये महादेव मंदिराजवळ पायी जात होत्या. याचवेळी मागून दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून धूम ठोकली. अन्य एका घटनेत शिवशंकर कॉलनीत लता रेड्डी या ५७ वर्षीय महिलेलाही अशाच प्रकाराला सामोरे जावे लागले. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास रेड्डी या शिवशंकर कॉलनीतील हनुमान मंदिराबाहेर उभ्या होत्या. याच वेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील १३ ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला. या दोन्ही घटनांची नोंद पोलिसांनी घेतली असली तरी अद्याप सोनसाखळी चोर मात्र त्यांच्या हाती लागलेले नाहीत.

अन्य एका घटनेत आंबेडकर चौक भीमनगर येथील शंकर सूर्यवंशी (वय ७७) या ज्येष्ठ व्यक्तीला रिक्षाचालकाने लुटल्याचा प्रकार समोर आला. एलआयसी एजंट असलेल्या सूर्यवंशी यांनी सोमवारी (२० ऑक्टोबर) दुपारी एसएफएस शाळेसमोरील बँकेतून ५० हजार रुपये काढले होते. हे पैसे घेऊन ते रिक्षाने कैलासनगरमार्गे सिल्लेखान्याकडे निघाले होते. त्यांना बगडिया रुग्णालयाजवळ सोडून रिक्षाचालक निघून गेला. काही क्षणातच आपल्या त्यांच्या खिशातील सगळे पैसे गायब असल्याचे सूर्यवंशी यांच्या लक्षात आले. या प्रकरणाची नोंद क्रांती चौक पोलिसांनी घेतली आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सिटी चौक परिसरातून २१ वर्षीय तरुणी बेपत्ता

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software