शहर पाणी योजनेच्या ‘खड्ड्या’ने घेतला चिमुकल्याचा बळी!; देवळाईतील घटनेने संताप, ‘आता ठेकेदार कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करा’

On

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : शहर पाणी योजनेची जलवाहिनी टाकण्यासाठी देवळाई परिसरातील म्हाडा कॉलनीत मोठे खड्डे खोदून ठेवलेले आहेत. या खड्ड्यात सध्या पावसाचे पाणी साचले आहे. याच खड्ड्यात पडून बुधवारी (३ सप्‍टेंबर) सायंकाळी पाचला ईश्वर संदीप भास्कर (वय साडेतीन वर्षे) या चिमुकल्याचा मृत्‍यू झाला.

संदीप भास्कर (वय ३०) हे १२ वर्षांपासून शहरात राहतात. मिळेल ते सुतारकाम करून उदरनिर्वाह करतात. बुधवारी १२ ला घरापासून काही अंतरावर ईश्वर मुलांसोबत खेळत होता. खेळता खेळता तो खड्ड्यात पडला. यामुळे त्याचे मित्र घाबरून गेले. त्यांनी घरी धाव घेऊन ईश्वरची आई रेखा (वय २६) यांना सांगण्याचा प्रयत्‍न केला. मात्र चिमुकल्यांना नीट सांगता येत नसल्याने रेखा यांना ते कळले नाही. मात्र बराच वेळ होऊनही ईश्वर दिसत नसल्याने रेखा यांनी शोधायला सुरुवात केली. ईश्वर खड्ड्यात बुडाल्याचे आढळले. तोपर्यंत घटनेला दोन तास उलटून गेले होते. खड्ड्यात मृतदेह तरंगलेला पाहून रेखा यांनी टाहो फोडत १५ फूट खोल खड्ड्यात उडी घेतली.

मात्र नागरिकांनी त्यांना बाहेर काढत वाचवले. ईश्वरला घाटी रुग्णालयात नेले. मात्र नाका-तोंडात पाणी गेल्याने मृत्यू झालेला होता. चिकलठाणा पोलीस ठाण्याचे निरीक्षक रविकिरण दरवडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. रस्त्यात किंवा सार्वजनिक ठिकाणी असे काम सुरू असेल तर कुंपन घालणे गरजेचे असते. मात्र कंत्राटदार कंपनीने याकडे दुर्लक्ष केल्याने ही दुर्घटना घडली. यापूर्वी पाइप टाकल्यानंतर ठेकेदार खड्डे तसेच सोडून निघून जातात म्‍हणून नागरिकांनी हे काम थांबवले होते. त्‍यावेळी पोलीस आयुक्‍त प्रवीण पवार यांनी कामात अडथळा आणला तर गुन्हा दाखल करू, असा दम भरला होता. आता ठेकेदार कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. विशेष म्‍हणजे, पाणी नसताना या खड्ड्यात अनेक मुले पडली होती. तरीही पाइप टाकून खड्डे बुजवले नाहीत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बाप्पासमोरच मंत्री शिरसाट-खैरेंमध्ये रंगला ‘माना’चा पॉलिटिकल ड्रामा!; आरतीनंतर शिरसाट म्हणाले... (व्हिडीओसह)

Latest News

बाप्पासमोरच मंत्री शिरसाट-खैरेंमध्ये रंगला ‘माना’चा पॉलिटिकल ड्रामा!; आरतीनंतर शिरसाट म्हणाले... (व्हिडीओसह) बाप्पासमोरच मंत्री शिरसाट-खैरेंमध्ये रंगला ‘माना’चा पॉलिटिकल ड्रामा!; आरतीनंतर शिरसाट म्हणाले... (व्हिडीओसह)
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : खासदारकी नसली तरी अजूनही चंद्रकांत खैरे हे खासदार असल्यासारखेच वावरत असतात. कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाचा मान...
Tech News : फोन चार्जिंग करताना वापरत असाल तर सावधान!
Beauty Feature : आता घरीच करा हेअर स्पा!; पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही, १०० रुपयांत हजार रुपयांचे काम होतील
Adhyatm : चंद्रग्रहणाने सुरू होतेय श्राद्ध; जाणून घ्या ग्रहणात श्राद्ध तर्पणचा नियम काय?
एका युवकासोबतची छायाचित्रे व्हायरल झाल्याने महिला हादरली!; सायबर पोलिसांनी शोधून काढले बदनामी करणारे दोघे!, छ. संभाजीनगरची धक्कादायक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software