जाधववाडीत २३ वर्षीय तरुणाची आत्‍महत्‍या, प्रेमप्रकरणातून टोकाचे पाऊल : पोलीस सूत्र

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जाधववाडी येथील २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केल्याची घटना मंगळवारी (९ डिसेंबर) रात्री १० ला समोर आली. त्याच्या खोलीत सुसाइड नोट मिळाली असून, प्रेमप्रकरणातून ही घटना घडल्याचे हर्सूल पोलीस सूत्रांनी सांगितले.

शक्ती गोरख शिंदे (रा. पिशोर, ता. कन्नड, ह. मु. जाधववाडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो ४ ते ५ महिन्यांपासून सायबर सुरक्षेसंदर्भात कोर्स करण्यासाठी जाधववाडीत राहत होता. मंगळवारी रात्री त्याचे मित्र जेवायला गेले तेव्हा शक्ती एकटाच खोलीत होता. खिडक्या, दरवाजा बंद करून त्याने टोकाचे पाऊल उचलले. हर्सूल पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात दर मिनिटाला वाढताहेत फ्‍लॅटच्या किंमती

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software