SP कार्यालयातील लाचखोर कनिष्ठ लिपिक सुभाष नवलू ACB च्या जाळ्यात

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातील लाचखोर कनिष्ठ लिपिक सुभाष रामदास नवलू (वय ४७) सोमवारी (२३ जून) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला. नवलू याने एका पोलीस अंमलदाराकडून डीजी लोनचे काम लवकर करून देण्याच्या बदल्यात ३ हजार रुपये मागून त्याचा भावजी कमलेश गोकुळ इंदूरकर (४७, रा. गवळीपुरा, छावणी) याला फोन पे करायला […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातील लाचखोर कनिष्ठ लिपिक सुभाष रामदास नवलू (वय ४७) सोमवारी (२३ जून) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला. नवलू याने एका पोलीस अंमलदाराकडून डीजी लोनचे काम लवकर करून देण्याच्या बदल्यात ३ हजार रुपये मागून त्याचा भावजी कमलेश गोकुळ इंदूरकर (४७, रा. गवळीपुरा, छावणी) याला फोन पे करायला सांगितले. पैसे मिळाल्याची खात्री होताच एसीबीच्या पथकाने त्याच्या भावजीलाही ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षक कार्यालयातच ही कारवाई करण्यात आली, हे विशेष.

पोलीस अधीक्षक संदीप आटोळे यांनी या कारवाईची माहिती दिली. ३२ वर्षीय पोलीस अंमलदार यांनी जालना जिल्ह्यातील परांडा (ता. अंबड) येथे प्लॉट खरेदी केलेला आहे. बांधकामासाठी घर बांधणी अग्रीम (डीजी लोन) मिळण्यासाठी त्यांनी ७ एप्रिलला अर्ज केला होता. काही दिवसांनी याबाबत माहिती विचारण्यासाठी ते ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिक नवलूकडे गेले. तेव्हा नवलूने हे काम माझ्याकडे असून प्रस्ताव लवकरात लवकर पाठविण्यासाठी व डीजी लोन मंजूर करण्यासाठी ३ हजार रुपयांची मागणी केली. ५ मे रोजी नवलूने पुन्हा फोन करून त्यांना कार्यालयात बोलावून घेतले. काम झटपट करून देतो, असे म्हणत पुन्हा पैशांची मागणी केली.

मात्र, पोलीस अंमलदार हे लाच देण्यास इच्‍छुक नव्हते. त्‍यामुळे त्‍यांनी एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता नवलूने लाच मागितल्याचे निष्पन्‍न झाले. सोमवारी नवलूच्या सांगण्याप्रमाणे तक्रारदार पोलीस अंमलदार यांनी कमलेश इंदूरकरच्या फोन पेवर ३ हजार रुपये पाठवले. पैसे मिळाल्याची खात्री झाल्यानंतर एसीबीने लगेच दोघांना उचलले. नवलूच्या अंग झडतीत मोबाईल व २१०० रुपये तर कमलेशकडे मोबाईल आणि ३५४० रुपये मिळाले. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर अधीक्षक मुकुंद आघाव, उपअधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे, केशव दिंडे, अंमलदार राजेंद्र सिनकर, राजेंद्र नंदिले, विलास चव्हाण यांनी केली. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर

Latest News

चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर चांगली बातमी! रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात देवेंद्रभाऊंकडून १३ व्या हप्त्याची रक्कम येणार, सरकारने २९८४ कोटी रुपये केले मंजूर
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. जुलै महिन्याचा हप्ता खात्यात जमा झाल्याचा संदेश लवकरच त्यांच्या...
जायकवाडी धरण तुडूंब भरताच विसर्ग सुरू, जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन
मॅरिड असूनही प्रेमाचा अट्टहास, तिला पती सोडायला लावून दुसरे लग्‍न केले, आता तिला एकीकडे म्हणतो ‘फालतू’; दुसरीकडे सांगतो, माझे अनेकींशी लफडे!!; लासूरस्टेशनच्या ३१ वर्षीय युवतीची पोलिसांत तक्रार
ऑगस्टमधील पहिला प्रदोष व्रत ६ की ७ ऑगस्टला? पूजा करण्याची तारीख, मंत्र आणि पद्धत जाणून घ्या
नागपंचमीला झोका खेळताना पडून शेतकऱ्याचा मृत्‍यू, पैठणची घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software