शहाबाजार खून : समीर खानची निर्घृण हत्या करणाऱ्यांची पोलीस कोठडीत कसून चौकशी!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : शहाबाजारातील निशांत दर्ग्याजवळ शुक्रवारी (३१ ऑक्‍टोबर) सायंकाळी ५.३० वाजता नशेखोरांच्या टोळक्याने भर रस्त्यावर समीर खान इनायत खान (वय ३०, रा. काचीवाडा, शहाबाजार) याची तलवार, चाकूने गळा, पोटात तब्बल सतरा वार करत निर्घृण हत्या केली होती. पोलिसांनी मारेकरी इस्लाम खान खमर खान उर्फ असलम चाऊस (वय २७, रा. शहागंज), मोहम्मद नसिर मोहम्मद फारुख उर्फ इता (वय ३२, रा. रशीदपुरा), इसरार खान निसार खान (वय २३) व शोएब अन्वर खान उर्फ काला (वय २१, दोघे रा. पंचायत समितीमागे) यांना शुक्रवारी रात्री उशिरा अटक केली होती. त्यांना शनिवारी (१ नोव्हेंबर) न्यायालयात हजर केले न्यायालयाने ५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

मृतक समीरची पत्नी सना कौसर समीर खान (वय २५, रा. काचीवाडा, शहाबाजार) हिने या प्रकरणात सिटी चौक पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मर्डरची धमकी देणाऱ्या आसिफ रायडरसह मारेकरी शोएब काला, इसरार खान, मोहम्मद नसिर, असलम चाऊस यांच्याविरुद्ध सिटी चौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. समीर हा पत्नी सना, तीन चिमुकल्या मुलींसह काचीवाड्यात राहत होता. तो शहागंज मंडी येथे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होता. २८ ऑक्‍टोबरला रात्री शोएब खानच्या फिर्यादीवरून समीर खान आणि त्याचा मित्र शाहरुख यांच्याविरुध्द शस्त्राने मारल्याचा गुन्हा दाखल झाला होता.

त्यानंतर समीर व सनाने २९ ऑक्‍टोबरला सिटी चौक पोलीस ठाण्यात जाऊन समीरला आसिफ रायडर, हफिज उर्फ टकला, शोएब काला यांनी शिवीगाळ करून हाताचापटाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली म्हणून तक्रार दिली होती. त्यानंतर आसीफ रायडर याने समीरला कॉल करून तुझे किसी के हाथ से मार दूंगा, तेरा मर्डर करूंगा, अशी धमकी दिली होती. शुक्रवारी समीर हा त्याचा मित्र शारेक बाली याचा फोन आल्याने त्याला भेटण्यासाठी घरातून मोटारसायकलीने गेला होता.

काही वेळाने शारेकने समीरच्या पत्नीला फोन करून समिरच्या हत्येची माहिती दिली होती. सनाने ही माहिती तिचा भाऊ जाबिरला दिल्यानंतर पायी चालत शहाबाजार सिटीझन हॉस्पिटलसमोरील गल्लीत गेली. त्याठिकाणी तिला समीर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. तिथे शारेक व इतर लोकांनी समीरला रिक्षातून घाटी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले होते. समीरचे काही दिवसांपासून मारेकऱ्यांसोबत वाद सुरू होते. हत्येच्या कटात सहभागी असणाऱ्या अन्य संशयितांचाही शोध पोलीस घेत आहेत. हल्लेखोरांना तलवार, चाकू कोणी पुरवले, याचाही शोध घेतला जात आहे.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

घरगुती गॅस वापरल्यास आता हॉटेलचालकांवर थेट गुन्हे दाखल!; बु‌ढीलाईनमध्ये मोठी कारवाई, वडे-भजे तळत असतानाच धडके पथक...

Latest News

घरगुती गॅस वापरल्यास आता हॉटेलचालकांवर थेट गुन्हे दाखल!; बु‌ढीलाईनमध्ये मोठी कारवाई, वडे-भजे तळत असतानाच धडके पथक... घरगुती गॅस वापरल्यास आता हॉटेलचालकांवर थेट गुन्हे दाखल!; बु‌ढीलाईनमध्ये मोठी कारवाई, वडे-भजे तळत असतानाच धडके पथक...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : घरगुती गॅसवर वडे, भजे तळणाऱ्या हॉटेलचालकाविरुद्ध बुढीलाईनमध्ये रविवारी (१५ मार्च) दुपारी १२ ला कारवाई...
आधी कोण?; अध्यक्षपदासाठी भाजप, शिंदे गटात रंगली वर्चस्वाची लढाई, ठाकरे गटाच्या आशा पल्लवीत... उद्या काय होणार?
खडकेश्वरमधील ती काळरात्र... २ भंगारवेचकांच्या अंगावरून चारचाकी गेली... एकाचा मृत्यू, दुसरा जखमी; जगण्यासाठीची धडपड थांबली...
ट्रॅव्हल्स ऑफीसमध्ये टवाळखोराचा राडा, चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याच्या धमक्या, प्रवाशाला लुटले!; सिडको बसस्थानकाजवळील घटना
सिल्लोडमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला एसटी बसने उडवले, तरुणाचा जागीच मृत्यू
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software