- News
- सिटी क्राईम
- रामनगरमध्ये खून!; २७ वर्षीय तरुणाला २ नशेखोरांनी चाकूने भोसकले, ऐन दिवाळीत छत्रपती संभाजीनगर हादरले!...
रामनगरमध्ये खून!; २७ वर्षीय तरुणाला २ नशेखोरांनी चाकूने भोसकले, ऐन दिवाळीत छत्रपती संभाजीनगर हादरले!!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : ऐन दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर आणखी एका हत्येच्या घटनेने हादरले. शहरातील रामनगरमध्ये जालना रोडच्या सर्व्हिस रोडवर मंगळवारी (२१ ऑक्टोबर) पहाटे दोनच्या सुमारास (मध्यरात्री) दोन गावगुंडांनी २७ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली. विपुल मधुकर चाबूकस्वार (रा. तोरणगडनगर, सिडको) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून, मुकुंदवाडी पोलिसांनी मारेकरी आशिष गौतम चौथमल (रा. मुकुंदवाडी) व त्याचा साथीदार सुबोध भास्कर देहाडे (रा. मुकुंदवाडी) यांना अटक केली आहे.
मुकुंदवाडी, रामनगरात सध्या गावगुंडांच्या टोळ्या मोठ्या प्रमाणावर तयार झाल्या आहेत. त्यामुळे गुन्हे वाढले आहेत. एकट्यादुकट्याला लुटणे, मारहाण करणे, महिला-मुलींची छेड काढणे असे प्रकार सातत्याने घडत आहेत. पोलीस या सर्व प्रकाराला गांभीर्याने घेत नसल्याचा वारंवार आरोपही होतो. गावगुंड शस्त्रे घेऊनच फिरत असतात. ते सोशल मीडियावर शस्त्रांसह फोटो टाकून दहशत निर्माण करतात. नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी करूनही पोलीस दुर्लक्ष करत असल्याने मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अक्षरशः गुंडाराज सुरू असून, नागरिक भयग्रस्त होऊन जगत आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
बाजारसावंगीत विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
By City News Desk
मुकुंदवाडीत चुकून धक्का लागल्याने दुचाकीस्वारावर चाकूचे वार!
By City News Desk
छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ
By City News Desk
Latest News
05 Mar 2026 15:19:32
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महापालिकेत स्थायी समिती सदस्य निवडण्यासाठी आज, ५ मार्चला सकाळी ११ ला विशेष सर्वसाधारण सभा...

