इंदिरानगरात घबराटीचे वातावरण : रात्री घरांवर तुफान दगडफेक, वाहने फोडली, ८ जण ताब्यात, दंगा काबू पथक तैनात

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गारखेड्यातील इंदिरानगरात अनेक महिन्यांपासून काही गुन्हेगार अवैधरीत्या दारू विकतात. यातून दिवसा निर्माण झालेल्या वादाचे पर्यावसान रात्री दगडफेकीत झाले. धूलिवंदनाच्या दिवशी (३ फेब्रुवारी) प्रकार घडला. दोन्ही गटांच्या परस्परविरोधी तक्रारींवरून पोलिसांनी या प्रकरणात गुन्हे दाखल करत ८ जणांना ताब्यात घेतले आहे. या भागात दंगा काबू पथक तैनात करण्यात आले होते.

इंदिरानगरमधील जुनेद किराणा दुकानाजवळ उभे राहण्यावरून वाद सुरू झाला, असे सूत्रांनी सांगितले. संतोष विष्णू खरात याच्या तक्रारीनुसार, ३ मार्चला दुपारी भारत, निखिल व जावेद यांच्यात वाद सुरू होते. संतोषने वाद सोडवण्याचा प्रयत्न केला असता गुलाब, सत्तार खान यांनी त्याला मारहाण केली. वाद वाढताच हल्लेखोरांनी त्याच्या २ बहिणी, वहिनीलाही मारहाण करून गंभीर जखमी केले, असे तक्रारीत म्हटले आहे. सत्तार खान मोहम्मद गौस खानच्या तक्रारीनुसार, विकास खरात, आकाश खरात, योगेश खरात, संतोष खरात यांनी दुपारी २ वा. त्याची वाट अडवली. त्यातून वाद होत मारहाण करून जखमी केले, असे म्हटले आहे. हाणामारीनंतर जखमींसह जमाव जवाहरनगर पोलीस ठाण्यात गेला. पोलिसांनी जखमींना मेडिकल मेमो देऊन घाटी रुग्णालयात पाठवले. काही संशयितांना पोलीस ठाण्यातच बसवू ठेवले.

रात्री एका गटातील संशयिताने चक्कर येत असल्याचे नाटक केले. त्यामुळे पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेण्याची मुभा त्याच्या कुटुंबाला दिली. त्याच्या काही वेळातच रात्री ११ वा. इंदिरानगरात १२ ते १५ जणांच्या गटाने स्थानिकांवर दगडफेक केली. काठ्यांनी विजेचे मीटर व सहा ते सात दुचाकी फोडल्या. यात योगेश खरात याचीही दुचाकी फोडण्यात आली. त्यामुळे तणाव निर्माण होऊन दोन्ही गट समोरासमोर आले. माहिती मिळताच पोलिसांनी इंदिरानगरात धाव घेऊन संशयितांची धरपकड सुरू केली. बुधवारी (४ मार्च) दुपारी खरात कुटुंबासह इंदिरानगरमधील नागरिक मोठ्या संख्येने जवाहरनगर पोलीस ठाण्यासमोर जमले. उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनीही पोलीस ठाण्यात धाव घेतली. तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. ठोस कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर जमाव परतला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बाजारसावंगीत विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Latest News

बाजारसावंगीत विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या बाजारसावंगीत विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) बाजार सावंगी (ता. खुलताबाद) येथील ३८ वर्षीय विवाहितेने विहिरीतील पाण्यात उडी मारून आत्महत्या केली. ही घटना...
काँग्रेसच्या तिकिटावरून निवडून आलेल्या जि. प. सदस्य तृप्ती राजपूत भाजपमध्ये!; कन्नडमध्ये खळबळ 
आकाशवाणी चौक पुन्हा बंद!; ५४ दिवसांत पोलिसांचा यु टर्न..., वाढते अपघात, वाहतूक कोंडीचे दिले कारण
इंदिरानगरात घबराटीचे वातावरण : रात्री घरांवर तुफान दगडफेक, वाहने फोडली, ८ जण ताब्यात, दंगा काबू पथक तैनात
इंडिगो हाल करणार!; सायंकाळी नवी मुंबईचा हेलपाटा पडणार..., छत्रपती संभाजीनगरच्या प्रवाशांमध्ये संतप्त पडसाद, नक्की काय बदल केलेत जाणून घेऊ...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software