भरधाव ट्रकने दुचाकीला मागून ठोकरले, दाम्‍पत्‍यासह चिमुकली जखमी, वाळूज MIDC तील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भरधाव ट्रकने दुचाकीला मागून ठोकरल्याने दाम्पत्यासह त्यांची ४ वर्षीय नात जखमी झाली. ही घटना सोमवारी (२ फेब्रुवारी) सकाळी पावणेदहाच्या सुमारास पंढरपूरच्या कामगार चौकात घडली.

पांडुरंग जनार्धन परदेशी (वय ५३, रा. भिम टाकळी ता. राहुरी जि. अहिल्यानगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, त्यांच्यावर सिग्मा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ते मजुरी करतात. सोमवारी (२ फेब्रुवारी) ते व त्यांची पत्नी वंदना (वय ४८) व ४ वर्षीय नात मोटारसायकलीने (एमएच १७, एएम ५२३७) पदमपुरा येथून गावी भिम टाकळी येथे जात होते. त्यांच्या मोटारसायकलला पंढरपूरच्या कामगार चौकात मागून येणाऱ्या ट्रकने (एमएच १७, बीवाय ५३०३) भरधाव येऊन धडक दिली. यात तिघेही जखमी होऊन रोडवर पडले. लोक जमलेले पाहून ट्रकचालक पळून गेला. पांडुरंग परदेशी यांच्या मुलाला कॉल करून बोलावल्यानंतर त्यांनी पांडुरंग आणि वंदना यांना सिग्मा हॉस्पिटलमध्ये तर नातीस अमृत बाल रुग्णालयात दाखल केले. ट्रकचालकाविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार संतोष सूर्यवंशी करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मुकुंदवाडीच्या पोलीस अंमलदारावर हॉटेलमध्ये राड्याचा आरोप, मारहाणीसह चाकू हल्ल्यात चौघे जखमी, हॉटेलमालकानेच पकडून करमाड पोलिसांत नेले...

Latest News

मुकुंदवाडीच्या पोलीस अंमलदारावर हॉटेलमध्ये राड्याचा आरोप, मारहाणीसह चाकू हल्ल्यात चौघे जखमी, हॉटेलमालकानेच पकडून करमाड पोलिसांत नेले... मुकुंदवाडीच्या पोलीस अंमलदारावर हॉटेलमध्ये राड्याचा आरोप, मारहाणीसह चाकू हल्ल्यात चौघे जखमी, हॉटेलमालकानेच पकडून करमाड पोलिसांत नेले...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे अंमलदार नितेश जाधव यांच्यासह चौघांविरुद्ध हॉटेलमध्ये केलेल्या राड्याप्रकरणी करमाड पोलिसांनी मंगळवारी...
सिडको एन ३ भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, महिलेने धरून ठेवल्याने १ तोळ्यापैकी ३ ग्रॅमचा भाग गेला...
अपघातानंतर फार्मसिस्टला दुचाकीस्वारांची मारहाण, मोबाइल हिसकावून पळाले... चिकलठाण्यातील घटना
भरधाव ट्रकने दुचाकीला मागून ठोकरले, दाम्‍पत्‍यासह चिमुकली जखमी, वाळूज MIDC तील घटना
रांजणगाव शेणपुंजीत एमआयडीसीच्या जागेवर पुतळा, झेंडा, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software