आकाशवाणी चौक पुन्हा बंद!; ५४ दिवसांत पोलिसांचा यु टर्न..., वाढते अपघात, वाहतूक कोंडीचे दिले कारण

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महापालिका निवडणुकीत राजकीय दबावाखाली येऊन आकाशवाणी चौक सुरू केल्यानंतर आता, ५४ दिवसांनी पुन्हा तो बंद करण्याचा निर्णय शहर पोलिसांनी घेतला आहे. आता पूर्वीप्रमाणेच सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत चौक वाहनांसाठी बंद राहील.

महिनाभरात चार अपघातांसह इतर किरकोळ अपघात, सतत वाहतूक कोंडी होत असल्याचे कारण चौक पुन्हा बंद करण्यासाठी देण्यात आले आहे. २०१६ मध्ये आकाशवाणी व अमरप्रीत हे दोन्ही चौक सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या विरोधात व्यापारी, नागरिकांनी आंदोलने केली. मात्र महापालिका निवडणुकीदरम्यान आकाशवाणी चौक अचानक खुला करण्यात आला. मंत्री संजय शिरसाट यांनी पोलीस आयुक्तांना याबाबत पत्र पाठवले होते.

यात राजकीय हस्तक्षेप झाल्याचे समोर आल्यानंतर निवडणूक आयोगाने खुलासाही मागवला होता. त्यानंतर पोलिसांनी जाहीर प्रगटन जारी करून निवडणुकीत शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा वेळ वाचवण्यासाठी तत्काळ यूटर्न घेता यावा, यासाठी चौक खुला केल्याचे नमूद करत चौकाबाबत आक्षेप, हरकती, सूचना मागवल्या होत्या. मात्र चौक खुला केल्यापासून अपघातांच्या संख्येत वाढीसह वाहतूक कोंडी होऊ लागल्याने चौक आता पुन्हा बंद करण्यात आला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बाजारसावंगीत विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Latest News

बाजारसावंगीत विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या बाजारसावंगीत विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) बाजार सावंगी (ता. खुलताबाद) येथील ३८ वर्षीय विवाहितेने विहिरीतील पाण्यात उडी मारून आत्महत्या केली. ही घटना...
काँग्रेसच्या तिकिटावरून निवडून आलेल्या जि. प. सदस्य तृप्ती राजपूत भाजपमध्ये!; कन्नडमध्ये खळबळ 
आकाशवाणी चौक पुन्हा बंद!; ५४ दिवसांत पोलिसांचा यु टर्न..., वाढते अपघात, वाहतूक कोंडीचे दिले कारण
इंदिरानगरात घबराटीचे वातावरण : रात्री घरांवर तुफान दगडफेक, वाहने फोडली, ८ जण ताब्यात, दंगा काबू पथक तैनात
इंडिगो हाल करणार!; सायंकाळी नवी मुंबईचा हेलपाटा पडणार..., छत्रपती संभाजीनगरच्या प्रवाशांमध्ये संतप्त पडसाद, नक्की काय बदल केलेत जाणून घेऊ...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software