महापालिकेत स्थायी समितीत १६ सदस्यांची निवड, भाजपचा वरचष्मा, हे आहेत नवे सदस्य...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) :  महापालिकेत स्थायी समिती सदस्य निवडण्यासाठी आज, ५ मार्चला सकाळी ११ ला विशेष सर्वसाधारण सभा सुरू झाली. सभेत भाजपचे ८ नगरसेवकांना स्थायी समितीत संधी मिळाली असून, ४ एमआयएमचे, शिंदे गटाचे २, ठाकरे गटाचा १ आणि वंचित बहुजन आघाडीचा १ असे १६ सदस्य निवडण्यात आले आहेत.

mi22

महापालिकेत एकूण ११५ नगसेवक असून, यात भाजपचे ५७, एमआयएमचे ३३, शिंदे गटाचे १३, ठाकरे गटाचे ६, वंचित बहुजन आघाडीचे ४, काँग्रेसचा १, शरद पवार गटाचा १ असे नगरसेवक आहेत. स्थायी समितीवर १६ सदस्य निवडून देण्यासाठी गटनेत्यांना यादी सादर करण्याची सूचना महापौरांनी केली होती.
स्थायी समितीत निवडलेले सदस्य असे :
भाजप : कमलाबाई रामचंद्र नरोटे, राजगौरव हरिदास वानखेडे, सुरेंद्र माणिकराव कुलकर्णी, रवि साहेबराव कावडे, अनिल श्रीकिशन मकरिये, अर्चना शैलेंद्र निळकंठ, माधुरी मिलिंद देशमुख (अदवंत),अप्पासाहेब विनायकराव हिवाळे.
एमआयएम : खान अब्दुल मतीन, मेराज खान जलील खान, पठाण मजहर पठाण अय्युब, अल्मास खान अमजद खान.
शिंदे गट : श्वेता सुमित त्रिवेदी आणि राजू मानसिंह राजपूत.
ठाकरे गट : सचिन सूर्यकांत खैरे.
वंचित बहुजन आघाडी : अमित भुईगळ.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

माता न तू वैरिणी...नवजात बाळाला शेतात फेकले, सुदैवाने नागरिकांनी वेळीच बघितले म्हणून वाचले...

Latest News

माता न तू वैरिणी...नवजात बाळाला शेतात फेकले, सुदैवाने नागरिकांनी वेळीच बघितले म्हणून वाचले... माता न तू वैरिणी...नवजात बाळाला शेतात फेकले, सुदैवाने नागरिकांनी वेळीच बघितले म्हणून वाचले...
सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोड शहरातील माऊलीनगर भागातील गव्हाच्या शेतात मंगळवारी (३ मार्च) सकाळी ९ च्या सुमारास क्रूर मातेने...
कावीळ सदृश आजाराने चिमुकलीचा मृत्यू, सिल्लोड तालुक्यातील दुर्दैवी घटना
घरात आग लागून ६ जण होरपळले, दशमेशनगरातील घटना
महापालिकेत स्थायी समितीत १६ सदस्यांची निवड, भाजपचा वरचष्मा, हे आहेत नवे सदस्य...
१८ मार्चला ठरणार छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष! भाजप कुणाच्या नावावर करणार शिक्कामोर्तब?, ही ४ नावे चर्चेत...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software