सिडको एन ३ भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, महिलेने धरून ठेवल्याने १ तोळ्यापैकी ३ ग्रॅमचा भाग गेला...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिडको एन ३ भागातील टेनिस कोर्टजवळ दुचाकीस्वार चोरट्यांनी एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावले. महिलेने मंगळसूत्र धरून ठेवल्याने १ तोळ्यापैकी ३ ग्रॅमचा भाग चोरट्यांच्या हाती गेला. ही घटना शनिवारी (२८ फेब्रुवारी) रात्री साडेआठच्या सुमारास घडली.

ममता महेंद्र मुनोत (वय ४३, रा. खिवंसरा फोर्ट, उल्कानगरी) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. शनिवारी (२८ फेब्रुवारी) रात्री साडेआठच्या सुमारास त्या व त्यांचे पती महेंद्र मुनोत मोटारसायकलीने उल्कानगरी येथून एन ३ सिडको येथे जात होते. टेनिस कोर्टजवळ अचानक मागून एका काळ्या पल्सरवर दोन तरुण (वय अंदाजे २५ ते २७) आले. त्यातील मागे बसलेल्याने ममता यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. ममता यांनी ते एका हाताने पकडले. मात्र मंगळसुत्रापैकी अंदाजे ३ ग्रॅम वजनाच्या पोतीचा काही भाग त्याच्याकडे गेला. ममता यांनी जोरात ओरडाओरड केल्याने आजूबाजूचे लोक धावून आले. त्याचवेळी चोरटे दुचाकीवरून सुसाट निघून गेले. ३ ग्रॅमचा मंगळसुत्राचा भाग २० हजार रुपयांचा त्यांनी नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ममता यांच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजीव म्हात्रे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मुकुंदवाडीच्या पोलीस अंमलदारावर हॉटेलमध्ये राड्याचा आरोप, मारहाणीसह चाकू हल्ल्यात चौघे जखमी, हॉटेलमालकानेच पकडून करमाड पोलिसांत नेले...

Latest News

मुकुंदवाडीच्या पोलीस अंमलदारावर हॉटेलमध्ये राड्याचा आरोप, मारहाणीसह चाकू हल्ल्यात चौघे जखमी, हॉटेलमालकानेच पकडून करमाड पोलिसांत नेले... मुकुंदवाडीच्या पोलीस अंमलदारावर हॉटेलमध्ये राड्याचा आरोप, मारहाणीसह चाकू हल्ल्यात चौघे जखमी, हॉटेलमालकानेच पकडून करमाड पोलिसांत नेले...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे अंमलदार नितेश जाधव यांच्यासह चौघांविरुद्ध हॉटेलमध्ये केलेल्या राड्याप्रकरणी करमाड पोलिसांनी मंगळवारी...
सिडको एन ३ भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, महिलेने धरून ठेवल्याने १ तोळ्यापैकी ३ ग्रॅमचा भाग गेला...
अपघातानंतर फार्मसिस्टला दुचाकीस्वारांची मारहाण, मोबाइल हिसकावून पळाले... चिकलठाण्यातील घटना
भरधाव ट्रकने दुचाकीला मागून ठोकरले, दाम्‍पत्‍यासह चिमुकली जखमी, वाळूज MIDC तील घटना
रांजणगाव शेणपुंजीत एमआयडीसीच्या जागेवर पुतळा, झेंडा, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software