रांजणगाव शेणपुंजीत एमआयडीसीच्या जागेवर पुतळा, झेंडा, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एमआयडीसीच्या जागेवर राजमाता जिजाऊ यांचा अर्धाकृती पुतळा बसविण्यात आल्याचे दिसल्याने एमआयडीसीने पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

महाराष्ट्र औ‌द्योगिक विकास महामंडळाचे (एम.आय.डी.सी.) तांत्रिक सहायक दिलीप चौथ यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, मंगळवारी (३ मार्च) सकाळी ११ च्या सुमारास ते आणि सुरक्षारक्षक गौतम मोरे, तुकाराम जाधव गस्तीवर असताना त्यांना वाळूज एमआयडीसीतील रांजणगाव फाटा येथील एमआयडीसीच्या भूखंडावर ६० मीटर रूंद रस्त्याच्या जागेत राजमाता जिजाऊ यांचा अर्धाकृती पुतळा दिसला.  काही अंतरावर एक धार्मिक ध्वज (निळा झेंडा अंदाजे १०  फूट उंचीचा) उभा केलेला दिसला. ही जागा विविध प्रकारच्या सेवा जसे की, जलवाहिनी, सांडपाणी वाहिनी, पावसाचे पाणी वाहून नेणारी वाहिनी, गॅस पाइपलाइन व इतरसाठी राखीव आहे. चौथ यांनी अर्धाकृती पुतळ्याबाबत विचारपूस केली असता, पुतळा कोणी बसवला याबाबत काही एक माहिती मिळू शकली नाही. पोलीस अंमलदार संतोष सूर्यवंशी करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सिडको एन ३ भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, महिलेने धरून ठेवल्याने १ तोळ्यापैकी ३ ग्रॅमचा भाग गेला...

Latest News

सिडको एन ३ भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, महिलेने धरून ठेवल्याने १ तोळ्यापैकी ३ ग्रॅमचा भाग गेला... सिडको एन ३ भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, महिलेने धरून ठेवल्याने १ तोळ्यापैकी ३ ग्रॅमचा भाग गेला...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिडको एन ३ भागातील टेनिस कोर्टजवळ दुचाकीस्वार चोरट्यांनी एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावले. महिलेने मंगळसूत्र...
अपघातानंतर फार्मसिस्टला दुचाकीस्वारांची मारहाण, मोबाइल हिसकावून पळाले... चिकलठाण्यातील घटना
भरधाव ट्रकने दुचाकीला मागून ठोकरले, दाम्‍पत्‍यासह चिमुकली जखमी, वाळूज MIDC तील घटना
रांजणगाव शेणपुंजीत एमआयडीसीच्या जागेवर पुतळा, झेंडा, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
मुकुंदवाडीत चुकून धक्का लागल्याने दुचाकीस्वारावर चाकूचे वार!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software