छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यातून ५ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील ३ आणि ग्रामीण भागातील २ मुलींना कुणीतरी पळवून नेले आहे. पोलिसांनी अपहरणाचे गुन्हे दाखल करून शोध सुरू केला आहे.

पहिल्या घटनेत मुकुंदवाडीतील १७ वर्षीय मुलीने सोमवारी (२ मार्च) मध्यरात्री १२ च्या सुमारास आईला आवाज दिला आणि सांगितले, की पोट दुखत आहे. घरात औषधी नसल्याने आईने तिला पोटाला बाम लावून झोपायला सांगितले. त्यानंतर मुलगी बाथरूमला जाते सांगून घराबाहेर पडली, तशी परतली नाही. मुलगी १२ वीत शिकते. तिच्या आईने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात मंगळवारी (३ मार्च) अपहरणाची तक्रार दाखल केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पुष्पा बोचारे करत आहेत.

दुसऱ्या घटनेत कांचनवाडीतील १४ वर्षीय मुलीचा दहावीचा पेपर असल्याने सिल्कमिल्क कॉलनीतील शाळेत २७ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता गेली. तिचा भाऊ दुपारी २ ला पेपर सुटण्याच्या वेळेस तिला आणायला शाळेत गेला असता ती दिसली नाही. ती घरीही गेली नव्हती. बराच शोध घेतल्यानंतर अखेर तिच्या आईने सातारा पोलीस ठाण्यात धाव घेऊन अपहरणाची तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप बचाटे करत आहेत.

तिसऱ्या घटनेत सिल्लोड तालुक्यातील अजिंठा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील १७ वर्षीय मुलगी घराला बाहेरून कडी लावून गेली. तशी परतली नाही. ही घटना २५ फेब्रुवारीला संध्याकाळी सातला घडली. मुलगी नाशिक येथे हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेते. आई आजारी असल्याने ४ महिन्यांपासून गावी आली होती. तिच्या वडिलांना मुलीच्या अपहरणाची माहिती मिळताच ते घरी आले. त्यानंतर नातेवाइक, तिच्या मैत्रिणी, बसस्थानक सगळीकडे तिचा शोध घेतला. अखेर अजिंठा पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार सांडू जाधव करत आहेत.

चौथ्या घटनेत रांजणगाव शेणपुंजी येथील १७ वर्षीय मुलगी २४ फेब्रुवारीला दुपारी दीडला नोटबुक आणण्यासाठी म्हणून घराबाहेर पडली. त्यानंतर परतलीच नाही. रात्री ८ ला कंपनीतून घरी आलेल्या तिच्‍या वडिलांनी मुलीचा शोध सुरू केला. मात्र ती मिळून आली नाही. अखेर वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिच्या वडिलांनी अपहरणाची तक्रार केली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संजय गित्ते करत आहेत. मुलगी १० वीत शिकत होती.

पाचव्या घटनेत गंगापूर शहरातील एका रुग्णालयात नर्सिंग कोर्सचे प्रशिक्षण घेत असलेल्या १७ वर्षीय मुलीचे २५ फेब्रुवारीला दुपारी ४ च्या सुमारास अपहरण झाले आहे. ती मूळची छत्रपती संभाजीनगर शहरातील असून, गंगापूरमध्ये मैत्रिणीसोबत रूम करून राहत होती. रूममधील मैत्रिणीने तिच्या वडिलांना सांगितले, की तिला कुणाचा तरी कॉल आला होता. त्यामुळे तिने रागाच्या भरात मोबाइल फोडला. फोन दुरुस्त करून येते, असे सांगून ती गेली. तशी परतली नाही. तिचा फोनदेखील बंद येत आहे. तिला कुणीतरी फूस लावून पळवून नेण्यात आल्याची तक्रार तिच्या वडिलांनी गंगापूर पोलीस ठाण्यात केली आहे. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिचा शोध सुरू केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार गणेश जाधव करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ

Latest News

छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यातून ५ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील ३...
प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना
गव्हाबरोबर गांजा वाढवला... पोलिसांचा शेतात छापा, ५ लाखांचा गांजा जप्त, शेतकऱ्याला अटक, करमाडजवळील कारवाई
वाळूज MIDC तील कमळापुरात दोन गटांत सशस्त्र हाणामारी; ४ गंभीर जखमी, वरिष्ठ पोलिसांचा फौजफाटा घटनास्‍थळी, परिस्थितीवर नियंत्रण (व्हिडीओसह)
१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software