- News
- उद्योग-व्यवसाय
- इंडिगो हाल करणार!; सायंकाळी नवी मुंबईचा हेलपाटा पडणार..., छत्रपती संभाजीनगरच्या प्रवाशांमध्ये संतप्त...
इंडिगो हाल करणार!; सायंकाळी नवी मुंबईचा हेलपाटा पडणार..., छत्रपती संभाजीनगरच्या प्रवाशांमध्ये संतप्त पडसाद, नक्की काय बदल केलेत जाणून घेऊ...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : इंडिगोची मुंबईसाठीची सायंकाळची विमानसेवा २९ मार्चपासून नवी मुंबई विमानतळावरून सुरू होणार आहे. ऑनलाइन आरक्षण प्रणालीत तसा बदलही करण्यात आला आहे.
-मुंबईचे सकाळचे विमान सध्या मुंबईहून सकाळी ६:१० वाजता निघून ७:२० वाजता छत्रपती संभाजीनगर शहरात उतरते. ते २९ मार्चपासून मुंबईहून पहाटे ५:३५ वाजता उड्डाण घेईल आणि ६:४५ वाजता शहरात येईल. परतीच्या प्रवासात सध्या हे विमान शहरातून सकाळी ७:५० उड्डाण घेते आणि ८:४५ वाजता मुंबईत पोहोचते. नव्या वेळापत्रकानुसार हे विमान सकाळी ७:१५ वाजता उड्डाण घेईल आणि ८:१५ वाजता मुंबईत पोहोचेल.
-मुंबईचे सायंकाळचे विमान सध्या मुंबईहून सायंकाळी ७:३५ वाजता निघून ८:४५ वाजता छत्रपती संभाजीनगर शहरात येते. ते २९ मार्चपासून नवी मुंबईहून सायंकाळी ७:३० वाजता निघून ८:२५ वाजता छत्रपती संभाजीनगर शहरात येईल. परतीच्या प्रवासात सध्या हे विमान शहरातून रात्री ९:१५ उड्डाण घेते आणि रात्री १०:१० वाजता मुंबईत पोहोचते. नव्या वेळापत्रकानुसार हे विमान रात्री ८:५५ वाजता उड्डाण घेईल आणि रात्री ९:५० वाजता नवी मुंबईत पोहोचेल.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
मुकुंदवाडीत चुकून धक्का लागल्याने दुचाकीस्वारावर चाकूचे वार!
By City News Desk
छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ
By City News Desk
Latest News
05 Mar 2026 08:43:27
खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) बाजार सावंगी (ता. खुलताबाद) येथील ३८ वर्षीय विवाहितेने विहिरीतील पाण्यात उडी मारून आत्महत्या केली. ही घटना...

