अपघातानंतर फार्मसिस्टला दुचाकीस्वारांची मारहाण, मोबाइल हिसकावून पळाले... चिकलठाण्यातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : अपघातानंतर स्कुटीस्वार फार्मसिस्टला दुचाकीवरील दोघांनी मारहाण केली आणि मोबाइल हिसकावून पळून गेले. ही घटना सोमवारी (२ मार्च) दुपारी पाऊणच्या सुमारास चिकलठाणा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात घडली.

अर्जुन मधुकर मते (वय २८ रा. जयपूर, वरझडी ता. जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी याप्रकरणात तक्रार दिली आहे. त्यांच्यावर सध्या चिकलठाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते आई, वडील व पत्नीसह राहतात. पैठण गेट येथील एका मेडीकलवर फार्मसिस्ट आहेत. तक्रारीनुसार, सोमवारी (२ मार्च) ते जयपूर येथून सकाळी सव्वा अकराच्या सुमारास स्कुटीवर (एमएच २० डीयू २६३४) बसून जालना रोडने छत्रपती संभाजीनगरला मेडीकलकडे येत होते. दुपारी पाऊणच्या सुमारास चिकलठाणा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आले असता चिकलठाणा गावातून एक मोटारसायकलस्वाराने मते यांना धडक दिली.

मते यांचा पाय स्कुटीखाली दबला. त्यानंतर मोटारसायकलवरील दोघांनी मते यांना उचलून अपघाताच्या कारणावरून हाताचापटाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. झटापटीत त्यांनी मते यांचा मोबाइल हिसकावला आणि पळून गेले. तक्रारीनुसार, तेथील फळ विक्रेत्यांकडून मते यांना मारहाण करणाऱ्या एकाचे नाव अजय राजू गायकवाड उर्फ नागीन (रा. चिकलठाणा) असल्याचे समोर आले. सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात येऊन मते यांनी तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी मारहाण करून लुटणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार सुभाष पवार करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मुकुंदवाडीच्या पोलीस अंमलदारावर हॉटेलमध्ये राड्याचा आरोप, मारहाणीसह चाकू हल्ल्यात चौघे जखमी, हॉटेलमालकानेच पकडून करमाड पोलिसांत नेले...

Latest News

मुकुंदवाडीच्या पोलीस अंमलदारावर हॉटेलमध्ये राड्याचा आरोप, मारहाणीसह चाकू हल्ल्यात चौघे जखमी, हॉटेलमालकानेच पकडून करमाड पोलिसांत नेले... मुकुंदवाडीच्या पोलीस अंमलदारावर हॉटेलमध्ये राड्याचा आरोप, मारहाणीसह चाकू हल्ल्यात चौघे जखमी, हॉटेलमालकानेच पकडून करमाड पोलिसांत नेले...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे अंमलदार नितेश जाधव यांच्यासह चौघांविरुद्ध हॉटेलमध्ये केलेल्या राड्याप्रकरणी करमाड पोलिसांनी मंगळवारी...
सिडको एन ३ भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, महिलेने धरून ठेवल्याने १ तोळ्यापैकी ३ ग्रॅमचा भाग गेला...
अपघातानंतर फार्मसिस्टला दुचाकीस्वारांची मारहाण, मोबाइल हिसकावून पळाले... चिकलठाण्यातील घटना
भरधाव ट्रकने दुचाकीला मागून ठोकरले, दाम्‍पत्‍यासह चिमुकली जखमी, वाळूज MIDC तील घटना
रांजणगाव शेणपुंजीत एमआयडीसीच्या जागेवर पुतळा, झेंडा, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software