- News
- सिटी क्राईम
- लग्नात व्हीआयपी पाहुणे आणण्यासाठी कल्पना उकळत होती पैसे!; स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता रमेशची सन्मा...
लग्नात व्हीआयपी पाहुणे आणण्यासाठी कल्पना उकळत होती पैसे!; स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता रमेशची सन्मानपत्रे खरी की खोटी, पोलिसांकडून तपास सुरू
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लग्नात व्हीआयपी पाहुणे आणण्यासाठीही कल्पना पैसे उकळायची. तसा १ लाख रुपयांचा व्यवहार समोर आला आहे. घोटाळ्यात कल्पनाचा प्रियकर अशरफनेही अनेक व्यवहार सांभाळले आहेत. देशाच्या सर्वोच्च पुरस्कारासाठी शिफारसपत्रे व सन्मानपत्रे जमा करणाऱ्या स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता रमेशचीही चौकशी होणार असून, त्याची ही कागदपत्रे खरी की खोटी याचाही तपास होणार आहे.
-उदयपूर (राजस्थान) येथील डॉ. निखिल भाकरे यांची मुख्यमंत्री आयुष्मान योजनेदरम्यान कल्पना भागवतसोबत ओळख झाली होती. कल्पना आणि डिम्पी हरजाईने त्यांना नॅशनल मेडिकल कमिशनमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून ५० हजार रुपयांचा गंडा घातला. यापूर्वी हॉस्पिटलच्या कार्यक्रमासाठी तिने डॉ. भाकरे यांच्याकडून विमानाचे तिकीट काढून घेतले होते.
-पुणे येथील सुधाकर जाधवर यांच्या मुलीच्या लग्नात व्हीव्हीआयपी पाहुण्यांना आणण्याचे आश्वासन देऊन या टोळीने जाधवर यांच्याकडून १ लाख रुपये उकळले होते.
-दत्तात्रय शेटे याने कल्पनासाठी बनावट आयएएस निवड यादी तयार केली होती. तो मूळ राहाता तालुक्यातील रहिवासी असून तो श्रीगोंदा परिसरात राहत होता. वैद्यकीय कारणासाठी तो पत्नीसह तिथे राहत होता. शेटेच्या वडिलांनी त्याचा मोबाइल पोलिसांना आणून दिला असून, त्यातील डेटा उडविण्यात आला आहे.
-पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती गायके यांच्या पथकाने डिम्पीला दिल्लीत नेऊन त्याच्या घराची झडती घेतली. त्याच्या घरातून पोलिसांनी पासपोर्ट जप्त केला आहे. डिम्पीला न्यायालयात हजर केले तेव्हा त्याचे आई-वडील, भाऊ आले होते.
कल्पना भागवत ६ महिन्यांपासून जालना रोडवरील ॲम्बेसेडर या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये मुक्कामी थांबली होती. सिडको पोलिसांनी तिला हॉटेलमधून २२ नोव्हेंबरला अटक केली होती. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अतुल येरमे हे करत आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
सिल्लोडच्या अन्वीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
By City News Desk
आदर्श घोटाळ्यातील संशयित महिला चक्क शिंदे गटात दाखल!
By City News Desk
महानुभाव आश्रमातून १२ वर्षीय मुलगा बेपत्ता
By City News Desk
Latest News
10 Dec 2025 15:11:52
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : इन्स्टाग्रामवर एका महिलेच्या नावाने बनावट खाते तयार करून, त्यावर तिचा फोटो लावून इतर महिलांना...

