बोगस ॲप डाऊनलोड केल्याने मेडिकल व्यावसायिकाचे गेले ९ लाख!, भामट्यांनी लोनही उचलले!!, छावणीतील धक्कादायक प्रकार

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आरटीओ चालान नावाचे बोगस ॲप डाऊनलोड केल्यामुळे छावणीतील एका मेडिकल व्यावसायिकाला ९ लाख रुपये बँक खात्‍यातून गमवावे लागले. मंगळवारी (२२ जुलै) त्‍यांनी छावणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्‍यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शेख वसिमोद्दीन शेख नजमोद्दीन (वय ५१, रा. गुरुवार बाजार) यांना १५ जुलै रोजी व्हॉट्स ॲपवर आरटीओ चालान ५०० रुपये या नावाने मेसेज आला. हा एपीके फॉरमॅटमधील मेसेज होता. वसीमोद्दीन यांनी त्‍यावर क्लिक करताच फोन हॅक झाला. अनेक ओटीपी येऊ लागले. त्यांनी नेट बँकिंगद्वारे खाते गोठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या बँकेचे सर्व पासवर्ड बदलून येस बँक खात्यातून २ लाख रुपये गायब केले. वसीमोद्दीन हे बँकेत जाईपर्यंत आणखी सात लाख रुपये भामट्यांनी खात्‍यातून काढून घेतले. याशिवाय वसीमोद्दीन यांच्या एचडीएफसी बँक खात्यावरील बचत खात्यावर ३ लाख ४५ हजारांचे जंबो लोनही घेतले.

अशी होते फसवणूक, नागरिकांनो सावध राहा...
बोगस एपीके म्हणजे बनावट अ‍ॅपची फाईल जी खोटी असते किंवा एखाद्या अधिकृत अ‍ॅपची कॉपी करून त्यात खतरनाक कोड घातलेला असतो. साइबर गुन्हेगार प्रसिद्ध अ‍ॅप्सचे डुप्लिकेट बनवतात. त्या अ‍ॅपमध्ये मालवेअर (वायरस), की-लॉगर किंवा स्क्रीन रेकॉर्डर असतो. SMS, WhatsApp, Telegram, Email किंवा Social Media वर लिंक पाठवली जाते. वापरकर्ता Play Store ऐवजी ती बोगस APK डाउनलोड करतो आणि Unknown sources वरून ती इंस्टॉल करतो. ते अ‍ॅप तुमच्याकडून SMS वाचण्याची, कॉल लॉग्स, कॅमेरा-मायक्रोफोन ॲक्सेस, स्क्रीन रेकॉर्डिंग-कंट्रोलच्या परवानग्या घेतं. एकदा परवानगी दिल्यावर तुमचा फोन हॅकर्सच्या ताब्यात जातो. त्‍याद्वारे OTP चोरले जातात. मोबाईल बँकिंग ॲप्सचा डाटा चोरी होतो. Screen recording किंवा key-logging द्वारे पासवर्ड मिळवतात. UPI अ‍ॅक्सेस घेतल्यास थेट पैसे वळवले जातात. त्‍यामुळे फक्त Google Play Store किंवा सरकारी पोर्टल वरूनच अ‍ॅप्स डाउनलोड करा. "Unknown sources" इन्स्टॉल ऑप्शन डिसेबल ठेवा. अ‍ॅप इंस्टॉल करताना permissions नीट तपासा. कोणतीही लिंक किंवा APK फाईल उघडू नका जी अनोळखी व्यक्तीकडून आली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

रस्‍त्‍याने एकटे पाहून अनेकांची लूटमार केली, काल्डा कॉर्नरजवळील लुटीनंतर भरले दिवस, जवाहरनगर पोलिसांनी शोधासाठी जंगजंग पछाडले, अखेर तिघांना केली अटक!

Latest News

रस्‍त्‍याने एकटे पाहून अनेकांची लूटमार केली, काल्डा कॉर्नरजवळील लुटीनंतर भरले दिवस, जवाहरनगर पोलिसांनी शोधासाठी जंगजंग पछाडले, अखेर तिघांना केली अटक! रस्‍त्‍याने एकटे पाहून अनेकांची लूटमार केली, काल्डा कॉर्नरजवळील लुटीनंतर भरले दिवस, जवाहरनगर पोलिसांनी शोधासाठी जंगजंग पछाडले, अखेर तिघांना केली अटक!
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : रस्‍त्‍याने एकट्याने जाणाऱ्यांना चाकूचा धाक दाखवून लुटायचे. सिडको एमआयडीसी, जवाहरनगर पोलीस ठाण्यात अनेकांना लुटल्यानंतर काल्‍डा...
कारमधून उतरल्यानंतर डॉक्‍टर कारमागे गेले, त्‍याचवेळी चालकाने जोरात रिव्हर्स घेतली, डॉक्‍टरांना धडक बसून मृत्‍यू, वाळूज MIDC तील दुर्दैवी घटना
अचानक कारचा दरवाजा उघडल्याने दुचाकीस्वाराच्या अंगावर बाजूच्या हॉटेलमधील गरम भाजीचे पातेले सांडले!, भाजून मृत्‍यू, कटकटगेटजवळील दुर्घटना
प्रियकराच्या ब्‍लॅकमेलिंगला कंटाळून १८ वर्षीय तरुणीची आत्‍महत्‍या, १९ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल, भावसिंगपुऱ्यातील धक्कादायक घटना
छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ : ब्‍लॅकमेलर प्रेयसीची प्रियकराने केली निर्घृण हत्‍या!; पैशांसाठी बलात्‍काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची देत होती धमकी, त्‍याने डोके दगडावर आपटून दौलताबाद घाटात फेकला मृतदेह

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software