- Marathi News
- सिटी क्राईम
- शिवाजीनगरात दागिन्यांची बॅग तर बीड बायपासवर मंगळसूत्र हिसकावून चोरटे पसार!
शिवाजीनगरात दागिन्यांची बॅग तर बीड बायपासवर मंगळसूत्र हिसकावून चोरटे पसार!
On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळसूत्र चोरीच्या दोन घटना ताज्या असतानाच, सातारा आणि पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी कहर केला आहे. शिवाजीनगरात दागिन्यांची बॅग दोन मुलींनी चोरून नेली, तर बीड बायपासवर वृद्धेचे मंगळसूत्र हिसकावून चोरटे पसार झाले. वाढत्या घटनांमुळे पोलीस उपायुक्त पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी बैठक घेऊन सर्व ठाणेदारांना तातडीने मंगळसूत्र चोरांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिले. गस्त वाढविण्याची सूचना केली.
अर्चना मुकेश भालके (रा. नक्षत्रवाडी) पतीसह रविवारी (१० ऑगस्ट) सायंकाळी शिवाजीनगर चौकात आल्या. तेथे थांबून त्यांनी भावासाठी राखी खरेदी केली. त्यानंतर मिठाईच्या दुकानात गेल्या. तेव्हा त्यांची बॅग दुचाकीवर लटकवलेली होती. दाम्पत्य मिठाई खरेदीत व्यस्त असताना चोरांनी बॅग लंपास केली. बॅगमध्ये २० हजार किंमतीचे ३ ग्रॅम सोन्याचे मनी व जुने कपडे होते. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात अर्चना भालके यांनी फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झाला आहे. यात दोन मुली बॅग घेऊन जाताना दिसत आहे.
शनिवारी सायंकाळी ७ च्या सुमारास लता प्रकाश सुरडकर (वय ६३, रा. शिवाजीनगर) या रेणुका माता मंदिरात दर्शन करून घराकडे पायी निघाल्या होत्या. बीड बायपास भागातील पु. ना. गाडगीळ ज्वेलर्ससमोर मोटारसायकलवर लाल जॅकेट व पांढरी टोपी घातलेला चोरटा मागून आला. त्याने लता यांच्या गळ्यातील साडेआठ ग्रॅमचे मंगळसूत्र हिसका मारून तोडले आणि पसार झाले. लताबाई यांनी आरडाओरड करेपर्यंत चोरटा पसार झाला. सातारा पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोराचा तपास सुरू केला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
भल्या पहाटे लोटाकारंजा येथे चोरट्याने दाखवली करामत, तरुणाची पोलिसांत धाव
By City News Desk
छ. संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मनाई आदेश
By City News Desk
Latest News
13 Aug 2025 18:13:40
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या गुन्ह्यांचे प्रमाण पार टोकाला पोहोचले आहे. अगदी क्षुल्लक कारणावरून झालेला वादही जिवावर...