जावयाने आवळला पत्‍नी, सासूचा गळा!; जीवे मारण्याचा प्रयत्‍न, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल, उल्कानगरीतील घटना

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कौटुंबीक वादातून जावयाने पत्नी व सासूचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. घरात तोडफोड केली. जवाहरनगर पोलिसांनी जावयाला शुक्रवारी (८ ऑगस्ट) अटक केली आहे. ही घटना उल्कानगरीत घडली.

पवन विष्णू ढाकणे (३५, रा. उल्कानगरी) असे जावयाचे नाव आहे. ३४ वर्षीय विवाहितेने या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्‍या प्राध्यापिका आहेत. २०१५ मध्ये त्यांचे लग्न पवनसोबत झाले होते. लग्नानंतर काही महिन्यांतच त्यांचा सासरी छळ सुरू झाला. घरात अपमानित केले जायचे. सासूने त्यांना मारहाण करताना डोक्यात स्टीलची बाटली मारून जखमी केले होते. दोन मुलांमुळे विवाहिता सर्व त्रास सहन करत राहिली. २०२१ मध्ये त्यांच्या पतीच्या मोबाइलमध्ये आढळलेल्या फोटोंवर करून दोघांत वाद झाले. पवनच्या मागणीवरून सासू-सासऱ्यांनी त्यांना उल्कानगरीत फ्लॅट घेऊन दिला. पवनने विवाहितेच्या वडिलांनादेखील मारहाण केली होती.

बुधवारी (६ ऑगस्ट) सायंकाळी विवाहितेकडे त्‍यांची आई आली. यावेळी त्यांनी पवनला समजावण्याचा प्रयत्न केला आता त्याने चिडून त्यांना शिवीगाळ सुरू केली. भांडण वाढून त्‍याने पत्नी आणि सासूचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्‍न केला. पवनने टीव्ही, आरसे फोडून पोलिसांत गेल्यास खून करून टाकेन, अशी धमकी दिली. घटनेची माहिती कळताच जवाहरनगर पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेतली. मायलेकीला धीर देत पोलीस ठाण्यात आणले. विवाहितेच्या तक्रारीवरून पवन, त्याचे आई, वडील व डॉक्टर बहिणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारी सहायक पोलीस निरीक्षक अतिश लोहकरे यांनी पवनला अटक केली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

लिफ्ट दिली, चाऊस कॉलनीत नेले, चाकूने भोसकले, पेरू विक्रेता गंभीर जखमी

Latest News

लिफ्ट दिली, चाऊस कॉलनीत नेले, चाकूने भोसकले, पेरू विक्रेता गंभीर जखमी लिफ्ट दिली, चाऊस कॉलनीत नेले, चाकूने भोसकले, पेरू विक्रेता गंभीर जखमी
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीवर बसवून तिघांनी पेरू विक्रेत्‍याला चाऊस कॉलनीत नेले. तिथे मारहाण करत चाकूने...
संशयावरून पोलिसांनी मोटारसायकल पकडली, निघाला साराच घोळ!; मछली खडक येथील घटना
ड्रग्‍जमाफिया अजय ठाकूरने भरकोर्टात सहायक फौजदाराच्या छातीत मारली लाथ!, छ. संभाजीनगरातील घटनेने पुन्हा पोलिसांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
स्वागतार्ह बदल : मनसैनिकांना मारहाण झाल्याने करोडी टोलनाक्‍याविरुद्ध मनसे पदाधिकारी पोलीस आयुक्‍तांना भेटले
छ. संभाजीनगरात महसूल सप्ताहाचा समारोप; स्वतःचे ज्ञान अद्ययावत करून लोकांना सेवा द्या : जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software