कर्णपुरा मैदानावरील छाप्यात नशेच्या औषधीचा मोठा साठा जप्त, दोघांना अटक

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : नशेच्या औषधीचा मोठा साठा अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने कर्णपुरा मैदानावरील छाप्यात जप्त केला. सोमवारी (८ डिसेंबर) पावणेसातला केलेल्या या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून एकूण १ लाख ४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सय्यद फेरोज सय्यद अकबर ऊर्फ अंधा फेरोज (वय ३०, रा. चांदमारी, पडेगाव, छत्रपती संभाजीनगर) आणि अयान शेख चाँद शेख (वय १९, रा. आरटीओ कार्यालयामागे वेदांतनगर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडे कोडीन सिरपच्या ३१ बाटल्या मिळून आल्या. २ मोबाइल आणि १ मोटारसायकलही जप्त करण्यात आली. दोघांविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्‍त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले, सहायक पोलीस आयुक्‍त वसुंधरा बोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रविकांत गच्चे, पोलीस उपनिरीक्षक अमोल म्हस्के, पोलीस अंमलदार लालखा पठाण, नवाब शेख, नीतेश सुंदर्डे, पोलीस अंमलदार सतिश जाधव, चालक पोलीस अंमलदार श्री. काळे यांनी केली.

पोलीस आयुक्‍तालयाअंतर्गत नव्याने स्थापन केलेल्या अंमली पदार्थ प्रतिबंध विभागासाठी खास मोबाइल क्रमांक 9529019061 देण्यात आला असून, त्यावर शहरात कोठेही अंमली पदार्थ विक्री करताना किंवा नशा करताना कोणी किंवा नशेखोरांच्या टोळ्या आढळल्यास फोन किंवा व्हॉटस ॲपद्वारे मेसेज करुन नागरिक माहिती देऊ शकतात. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. चांगली बातमी देणाऱ्यास योग्य ते बक्षीस देण्यात येईल, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक रविकांत गच्चे यांनी केले आहे.
(छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूजला बातमी पाठवायची? : cscndesk@gmail.com वर पाठवा.)

आणखी महत्त्वाच्या बातम्या

धुलिवंदनच्या हायप्रोफाइल पार्ट्यांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले ९० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त, ७ तस्करांच्या मुसक्या आवळल्या!

Latest News

धुलिवंदनच्या हायप्रोफाइल पार्ट्यांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले ९० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त, ७ तस्करांच्या मुसक्या आवळल्या! धुलिवंदनच्या हायप्रोफाइल पार्ट्यांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले ९० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त, ७ तस्करांच्या मुसक्या आवळल्या!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : धूलिवंदनानिमित्त हायप्रोफाइल पार्ट्यांसाठी छत्रपती संभाजीनगर शहरात एमडी ड्रग्जचा मोठा साठा मागविण्यात आला होता. पडेगावमध्ये...
दानवेंनी लावला खैरेंना रंग... जैस्वाल, राजूरकर, जंजाळ, घोडेले रंगात रंगुनी गेले...
प्रेयसीचे लग्न मोडले, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल, साखरपुडा उरकल्यानंतर नियोजित वराला इन्स्टाग्रामवर आले फोटो...,गंगापूरमधील धक्कादायक प्रकार
छत्रपती संभाजीनगरजवळ बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन?; उत्खननाची खोली पोहोचली २६ मीटरपर्यंत, २४ तास ४० हून अधिक गाड्या सुरू...
उंडणगावमध्ये ३५ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software