मै गँगस्टर हूं... गौणखनिज माफियाने सोशल मीडियावर रील टाकली अन्‌ महसूलचे पथक कारवाईसाठी धडकले!, छत्रपती संभाजीनगरच्या नायगावमध्ये २० लाखांची कारवाई

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : गँगस्टरने सोशल मीडियावर रील बनवून टाकली, की मैं गँगस्टर हूं... ही रील व्हायरल होऊन महसूलच्या अधिकाऱ्यांपर्यंत गेली. त्‍यानंतर तहसीलदारांनी सहकाऱ्यांसह मिळून नायगाव (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे छापा मारून अवैध गौणखनिज उत्‍खनन करणाऱ्या माफियाची वाहने ताब्‍यात घेतली. माफिया मात्र हाती लागला नाही. वाहने पथकाने जप्त केली आहेत. ही कारवाई आज, २४ जुलैला दुपारी दोनला करण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर तालुक्‍यातील डोंगर अनेक ठिकाणी माफियांकडून ओरबाडले जात आहेत. याकडे महसूल विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे. नायगाव परिसरातील डोंगर जवळपास १० माफियांनी अक्षरशः खिळखिळे करून सोडले आहेत. रात्रंदिवस हे डोंगर पोखरले जात आहेत. प्रशासनाच्या नाकावर टिच्‍चून हा सर्व प्रकार घडत आहे. एका माफियाने तर हद्दच केली. रील बनवून सोशल मीडियावर टाकली. ती महसूलच्या अधिकाऱ्यांपर्यंत गेल्यानंतर तहसीलदार कैलास वाघमारे, मंडळ अधिकारी विश्वनाथ नागुडे, अभिजीत शर्मा, संतोष बोडखे, प्रफुल्ल साळवे, कृष्णा प्रेमभरे, चेतन जाधव, राजू काळे यांच्या पथकाने पोलिसांना सोबत घेऊन नायगाव शिवार गाठले. या ठिकाणावरून जेसीबी, ट्रॅक्‍टर, हायवा जप्त केले.

कारवाईत हवे सातत्‍य...
नायगावच नव्हे, तर छत्रपती संभाजीनगर तालुक्‍यातील डोंगर वाचवायचे असतील महसूल प्रशासनाला ॲक्‍शन मोडवर येण्याची गरज असून, ठिकठिकाणी सुरू असलेली गौणखनिज चोरी रोखण्यासाठी मोहीम राबविण्याची गरज आहे. याकडे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

रस्‍त्‍याने एकटे पाहून अनेकांची लूटमार केली, काल्डा कॉर्नरजवळील लुटीनंतर भरले दिवस, जवाहरनगर पोलिसांनी शोधासाठी जंगजंग पछाडले, अखेर तिघांना केली अटक!

Latest News

रस्‍त्‍याने एकटे पाहून अनेकांची लूटमार केली, काल्डा कॉर्नरजवळील लुटीनंतर भरले दिवस, जवाहरनगर पोलिसांनी शोधासाठी जंगजंग पछाडले, अखेर तिघांना केली अटक! रस्‍त्‍याने एकटे पाहून अनेकांची लूटमार केली, काल्डा कॉर्नरजवळील लुटीनंतर भरले दिवस, जवाहरनगर पोलिसांनी शोधासाठी जंगजंग पछाडले, अखेर तिघांना केली अटक!
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : रस्‍त्‍याने एकट्याने जाणाऱ्यांना चाकूचा धाक दाखवून लुटायचे. सिडको एमआयडीसी, जवाहरनगर पोलीस ठाण्यात अनेकांना लुटल्यानंतर काल्‍डा...
कारमधून उतरल्यानंतर डॉक्‍टर कारमागे गेले, त्‍याचवेळी चालकाने जोरात रिव्हर्स घेतली, डॉक्‍टरांना धडक बसून मृत्‍यू, वाळूज MIDC तील दुर्दैवी घटना
अचानक कारचा दरवाजा उघडल्याने दुचाकीस्वाराच्या अंगावर बाजूच्या हॉटेलमधील गरम भाजीचे पातेले सांडले!, भाजून मृत्‍यू, कटकटगेटजवळील दुर्घटना
प्रियकराच्या ब्‍लॅकमेलिंगला कंटाळून १८ वर्षीय तरुणीची आत्‍महत्‍या, १९ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल, भावसिंगपुऱ्यातील धक्कादायक घटना
छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ : ब्‍लॅकमेलर प्रेयसीची प्रियकराने केली निर्घृण हत्‍या!; पैशांसाठी बलात्‍काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची देत होती धमकी, त्‍याने डोके दगडावर आपटून दौलताबाद घाटात फेकला मृतदेह

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software