भरधाव इनोव्हा कारने महिलेला उडवले, नंतर कारचालकानेच  खासगी रुग्णालयात भरती केले... हर्सूलची घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भरधाव इनोव्हा कारने मायलेकीला धडक दिली. यात वृद्ध महिला गंभीर जखमी झाली असून, त्यांच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही दुर्घटना छत्रपती संभाजीनगर- फुलंब्री रोडवरील सावंगी बसथांब्याजवळ समृद्धी लॉन्सच्या अलीकडे शनिवारी (१५ नोव्‍हेंबर) सकाळी ७ च्या सुमारास घडली.

हर्सूल पोलिसांनी इनोव्हा कारचालक धनराज कारभारी कदम (वय ३३, रा. धानोरा हस्ते पिंपळगाव जालना) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ऋषीकेश अप्पा पवार (वय ३१, रा. शिवतारा हौसिंग सोसायटी, समृध्दी लॉन्समागे हर्सूल) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते पत्नी व लहान मुलासह राहतात. चिकलठाण्यातील सीके डायकलिन कंपनीत नोकरी करतात. त्यांचे आई- वडील हे मूळ गावी सिदेफळ (ता. सिल्लोड) येथे राहतात. त्यांची आई दुर्गाबाई अप्पा पवार (वय ५६) या लेडीज टेलरिंगचे काम करतात. चार दिवसांपूर्वी त्यांची आई दुर्गाबाई व बहीण जनाबाई रमेश अंभोरे या ऋषिकेश यांच्याकडे आल्या होत्या.

शनिवारी सकाळी ७ ला आई दुर्गाबाई व बहीण जनाबाई या सिदेफळ गावाकडे जाण्यासाठी घरून सावंगी बसथांब्यावर आल्या. छत्रपती संभाजीनगर ते फुलंब्री जाणाऱ्या रोडवर डाव्या बाजूने पायी जात असताना समृध्दी लॉन्सच्या अलीकडे मागून सुसाट आलेल्या इनोव्हा कारने (MH 20 EY 9121) दुर्गाबाई यांना मागून जोरात धडक दिली. यात त्यांना कमरेला, डोक्याला, पोटाला व डाव्या हाताला, डाव्या पायाला मार लागला आणि जखमी झाल्या. इनोव्हा चालकाने वाहन थांबवून दोघींना त्याच्या गाडीत अजिंठा हॉस्पिटल, हडको कॉनर येथे दाखल केले. त्यानंतर तो स्वतःचे व पत्ता, संपर्क क्रमांक देत निघून गेला. डॉक्टरांनी औषधोपचार करून सांगितले, की दुर्गाबाई यांच्या कमरेचे हाड फ्रॅक्चर होऊन गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना पुढील उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरू आहेत. अधिक तपास पोलीस अंमलदार सलीम सय्यद करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

लग्नाचे आमिष दाखवून ३० वर्षीय युवतीवर वारंवार लैंगिक अत्याचार, वाळूज एमआयडीसीतील घटना, युवती साडेपाच महिन्यांची गर्भवती, आता लग्नाला नकार

Latest News

लग्नाचे आमिष दाखवून ३० वर्षीय युवतीवर वारंवार लैंगिक अत्याचार, वाळूज एमआयडीसीतील घटना, युवती साडेपाच महिन्यांची गर्भवती, आता लग्नाला नकार लग्नाचे आमिष दाखवून ३० वर्षीय युवतीवर वारंवार लैंगिक अत्याचार, वाळूज एमआयडीसीतील घटना, युवती साडेपाच महिन्यांची गर्भवती, आता लग्नाला नकार
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लग्नाचे आमिष दाखवून ३० वर्षीय युवतीसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवून, तिला प्रेग्नंट करून नंतर...
जिल्हा परिषदेत सत्तेसाठी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता, भाजपच्या अंतिम खेळीकडे लागल्या सर्वांच्या नजरा!
प्रा. राजाराम लोंढे खून प्रकरण : रीलस्टार तरुणीचेही प्रा. लोंढेंसोबत २५ लाखांचे व्यवहार!; व्यवहारांचे बाँडवर करारनामेही...
वाळूज MIDC तील बंद कंपनीत शेकडो घरगुती गॅस सिलिंडर्सचा साठा आढळल्याने खळबळ!
सिल्लोडच्या सुसाट पिकअप वाहनाने स्कुटीस्वार डॉक्टरांना उडवले, जागीच मृत्यू, पालोदवर शोककळा!!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software