- Marathi News
- सिटी क्राईम
- ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा : छत्रपती संभाजीनगरच्या खंडपीठात याचिका, केंद्र-राज्य सरकारसह ईडी, अवसा...
ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा : छत्रपती संभाजीनगरच्या खंडपीठात याचिका, केंद्र-राज्य सरकारसह ईडी, अवसायकाला नोटीस
On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बीड येथील ज्ञानराधा मल्टी-स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीत सुमारे ३५०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या घोटाळाप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली असून, न्या. मनीष पितळे व न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी केंद्र आणि राज्य शासन, सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि अवसायकांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. या याचिकेवर ३ आठवड्यांनंतर सुनावणी होणार आहे.
-ज्ञानराधा सोसायटीने १३ ते १८ टक्के व्याजाचे आमिष दाखवून देशभरातील सुमारे ६ लाख लोकांना गुंतवणुकीसाठी आकर्षित केले.
-आतापर्यंत सुमारे ३,५०० कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला. अनेक ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत.
ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत सुमारे १,४३३.४८ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
-केंद्रीय निबंधकांनी ज्ञानराधा सोसायटीवर अवसायक म्हणून बीडच्या जिल्हा उपनिबंधकांची नेमणूक केली आहे.
सोसायटीची मालमत्ता विकून मिळालेले पैसे ठेवीदारांना वितरित करावे. ठेवीदारांना त्यांचे हक्काचे पैसे व्याजासह तीन महिन्यांच्या आत परत मिळावेत. घोटाळ्याची व्याप्ती अनेक राज्यांत असल्याने केंद्रीय अन्वेषण विभागाकडे चौकशी सोपवावी.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
25 Jul 2025 22:12:45
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : रस्त्याने एकट्याने जाणाऱ्यांना चाकूचा धाक दाखवून लुटायचे. सिडको एमआयडीसी, जवाहरनगर पोलीस ठाण्यात अनेकांना लुटल्यानंतर काल्डा...