AI द्वारे अश्लील व्हिडीओ बनवून एमआयएम उमेदवाराची बदनामी!; सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एआयद्वारे अश्लील व्हिडीओ बनवून एमआयएम उमेदवाराची बदनामी करण्यात आली असून, त्यावरून पोलिसांनी आज, १४ जानेवारीला तौफिक कुरैशी नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील ३५ वर्षीय एमआयएम उमेदवाराने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे, की ते महापालिकेची नगरसेवक पदाची निवडणूक लढत आहेत. मंगळवारी (१३ जानेवारी) रात्री साडेदहाच्या सुमारास ते त्यांच्या संपर्क कार्यालयात असताना ओळखीच्या व्यक्तीने त्यांना एक व्हिडीओ पाठविला. त्यात कोणीतरी एआय पद्धतीने जाणीवपूर्वक त्यांचा अश्लील व्हिडीओ बनवून त्यावर ‘एमआयएम उम्मीददवार XXX XXX. क्या आपको ऐसे उम्मीदवार को चुनकर देना चाहिए’ असे वादग्रस्त वाक्य टाकले. हा व्हिडीओ व्हॉट्‌स ॲप ग्रुपवर तौफिक कुरैशी नावाच्या व्यक्तीने टाकला. हा व्हिडीओ व्हायरल करून समाजात बदनामी व्हावी या उद्देशाने हे कृत्य केले, असे तक्रारीत म्हटले आहे. मतदानावर परिणाम व्हावा या उ‌द्देशाने हा अश्लील व्हिडीओ व्हायरल करून जनतेत गैरसमज परसवून बदनामी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक भारत पाचोळे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

महापालिकेत स्थायी समितीत १६ सदस्यांची निवड, भाजपचा वरचष्मा, हे आहेत नवे सदस्य...

Latest News

महापालिकेत स्थायी समितीत १६ सदस्यांची निवड, भाजपचा वरचष्मा, हे आहेत नवे सदस्य... महापालिकेत स्थायी समितीत १६ सदस्यांची निवड, भाजपचा वरचष्मा, हे आहेत नवे सदस्य...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) :  महापालिकेत स्थायी समिती सदस्य निवडण्यासाठी आज, ५ मार्चला सकाळी ११ ला विशेष सर्वसाधारण सभा...
१८ मार्चला ठरणार छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष! भाजप कुणाच्या नावावर करणार शिक्कामोर्तब?, ही ४ नावे चर्चेत...
कर्जबाजारी शेतकऱ्याने ठिबक सिंचनच्या नळीने घेतला गळफास!, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना
बाजारसावंगीत विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
काँग्रेसच्या तिकिटावरून निवडून आलेल्या जि. प. सदस्य तृप्ती राजपूत भाजपमध्ये!; कन्नडमध्ये खळबळ 
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software