सिडको बसस्थानकावर ३ महिलांचा धुमाकूळ, नागरिकांनी दोघींना पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात, १ पळाली...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिडको बसस्थानकावर चोरट्या महिलांची टोळी सक्रीय असल्याचे सोमवारी (८ डिसेंबर) सकाळी ११ ला समोर आले. तिघींपैकी दोघी नागरिकांनी पकडल्या आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांची एक साथीदार पळून गेली. या महिलांनी दोन विवाहितांचे मनीमंगळसूत्र चोरल्याचे समोर आले. तिन्ही चोरट्या महिलांविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अर्चना देवानंद खंदारे (वय ४०, रा. मुकुंदवाडी) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्यांचे पती सुरक्षारक्षक आहेत. सोमवारी सकाळी ११ ला खंदारे कुटुंबाला वेरूळला जायचे होते. ते सर्व सिडको बसस्थानकावर आले. सिडको बसस्थानकातून सिटी बसने बाबा पेट्रोलपंपाकडे जायचे असल्याने सिटी बसमध्ये चढत असताना कोणीतरी अनोळखी महिलेने त्यांच्या गळ्यातील लांब मनीमंगळसूत्र असलेली सोन्याची पोत ६ ग्रॅम वजनाची ओढून तोडल्याची जाणीव अर्चना यांना झाली. त्यांनी लगेचच गळ्याला हात लावला असता लक्षात आले, की गळ्यातील सोन्याची पोत त्यातील काही सोन्याचे मनी व मंगळसूत्र त्या अनोळखी महिलेने चोरले आणि पळू लागली.

अर्चना यांनी आरडाओरड केल्याने त्यांचे पती देवानंद चोखाजी खंदारे व इतर लोकांनी पाठलाग करून दोन महिलांना पकडले व एक महिला पळून गेली. आणखी एक महिला अश्विनी आकाश पोटे (वय २२, रा. गुरुदत्तनगर गजानन मंदिराजवळ छत्रपती संभाजीनगर) यासुद्धा कुटुंबासह अक्कलकोट येथे जाण्यासाठी सिडको बसस्थानकावर आल्या असता बसमध्ये चढत असताना त्यांच्या गळ्यातील लांब मनीमंगळसूत्र आसलेली पोत कापून त्यातील मनी मंगळसूत्र व काही मनी असे चार ग्रॅम वजनाची पोत या महिलांपैकी कोणीतरी कापून चोरून घेऊन गेली.

लोकांनी पकडलेल्या महिलांची नावे चांदणी लक्ष्मण पवार (रा. मिटमिटा, पडेगाव, छत्रपती संभाजीनगर) व पिंकी सुशिल मिश्रा असे असल्याचे त्यांनी सांगितले. एक महिला तेथून पळून गेली. ३६ हजार रुपयांचे ६ ग्रॅमचे मनीमंगळसूत्र आणि ४० हजार रुपयांचे ४ ग्रॅमचे मनीमंगळसूत्र असलेली अर्धवट तुटलेली पोत असा एकूण ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल महिलांना चोरून नेला. अधिक तपास पोलीस अंमलदार सुभाष पवार करत आहेत.
(छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूजला बातमी पाठवायची? : cscndesk@gmail.com वर पाठवा.)

आणखी महत्त्वाच्या बातम्या

धुलिवंदनच्या हायप्रोफाइल पार्ट्यांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले ९० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त, ७ तस्करांच्या मुसक्या आवळल्या!

Latest News

धुलिवंदनच्या हायप्रोफाइल पार्ट्यांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले ९० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त, ७ तस्करांच्या मुसक्या आवळल्या! धुलिवंदनच्या हायप्रोफाइल पार्ट्यांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले ९० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त, ७ तस्करांच्या मुसक्या आवळल्या!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : धूलिवंदनानिमित्त हायप्रोफाइल पार्ट्यांसाठी छत्रपती संभाजीनगर शहरात एमडी ड्रग्जचा मोठा साठा मागविण्यात आला होता. पडेगावमध्ये...
दानवेंनी लावला खैरेंना रंग... जैस्वाल, राजूरकर, जंजाळ, घोडेले रंगात रंगुनी गेले...
प्रेयसीचे लग्न मोडले, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल, साखरपुडा उरकल्यानंतर नियोजित वराला इन्स्टाग्रामवर आले फोटो...,गंगापूरमधील धक्कादायक प्रकार
छत्रपती संभाजीनगरजवळ बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन?; उत्खननाची खोली पोहोचली २६ मीटरपर्यंत, २४ तास ४० हून अधिक गाड्या सुरू...
उंडणगावमध्ये ३५ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software