छत्रपती संभाजीनगरचे वरिष्ठ अधिकारी सायबर भामट्यांच्या निशाण्यावर? ;  जिल्हाधिकाऱ्यांनंतर आता मनपा आयुक्‍तांचे फेक अकाऊंट!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) :  गेल्या काही दिवसांत छत्रपती संभाजीनगरचे वरिष्ठ अधिकारी सायबर भामट्यांच्या निशाण्यावर आले आहेत. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या नावाने फेक फेसबुक खाते उघडल्याचा प्रकार यापूर्वी समोर आला होता. आता महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते उघडण्यात आल्याचे समोर आले. या खात्याद्वारे शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक व राजकीय नेत्यांना पैशांची मागणी करणारे मेसेज गेले. जी. श्रीकांत यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

रविवारी (९ नोव्हेंबर) दिवसभर फेक अकाऊंटद्वारे सायबर भामट्याने मेसेज केले. सुदैवाने कोणीही फसले नाही. मेसेजमध्ये भामट्याने २० ते २५ हजार रुपयांची मागणी केली. अनेकांनी थेट जी. श्रीकांत यांना हा प्रकार सांगितल्यानंतर ही बाब समोर आली. कुणीही माझ्या नावाने पैशांची मागणी करत असेल तर पैसे देऊ नये. या सायबर चोरट्यापासून सावधान राहण्याचे आवाहन जी. श्रीकांत यांनी केले आहे. केवळ माझ्याच नव्हे तर राज्यातील अनेक अधिकाऱ्यांच्या नावे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे कोणीही फसू नये, असेही ते म्हणाले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

महापालिकेत स्थायी समितीत १६ सदस्यांची निवड, भाजपचा वरचष्मा, हे आहेत नवे सदस्य...

Latest News

महापालिकेत स्थायी समितीत १६ सदस्यांची निवड, भाजपचा वरचष्मा, हे आहेत नवे सदस्य... महापालिकेत स्थायी समितीत १६ सदस्यांची निवड, भाजपचा वरचष्मा, हे आहेत नवे सदस्य...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) :  महापालिकेत स्थायी समिती सदस्य निवडण्यासाठी आज, ५ मार्चला सकाळी ११ ला विशेष सर्वसाधारण सभा...
१८ मार्चला ठरणार छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष! भाजप कुणाच्या नावावर करणार शिक्कामोर्तब?, ही ४ नावे चर्चेत...
कर्जबाजारी शेतकऱ्याने ठिबक सिंचनच्या नळीने घेतला गळफास!, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना
बाजारसावंगीत विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
काँग्रेसच्या तिकिटावरून निवडून आलेल्या जि. प. सदस्य तृप्ती राजपूत भाजपमध्ये!; कन्नडमध्ये खळबळ 
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software