- Marathi News
- सिटी क्राईम
- छत्रपती संभाजीनगरमध्ये लुटारूंचा कहर; रात्री-दिवसा, कोणत्याही वेळी होतो हल्ला अन् मारहाण करून लूटम...
छत्रपती संभाजीनगरमध्ये लुटारूंचा कहर; रात्री-दिवसा, कोणत्याही वेळी होतो हल्ला अन् मारहाण करून लूटमार!!, बेगमपुरा, जवाहरनगर, मुकुंदवाडी, सातारा परिसरातील घटना

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरात लुटमारीच्या घटना पुन्हा वाढल्या आहेत. भरदिवसा लुटारू कुणालाही अडवतात, शिवीगाळ, मारहाण करून लुटून पसार होतात. कधी ते दुचाकीने येतात, तर कधी रिक्षाने... त्यामुळे नागरिक भयग्रस्त झाले असून, शहर पोलिसांनी या लुटारूंचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. दोन दिवसांत ४ लुटमारीच्या घटना समोर आल्या आहेत. यात दोन नोकरदारांसह एका शेतकऱ्याला आणि एका महिलेला लुटण्यात आले आहे. बेगमपुरा, जवाहरनगर, मुकुंदवाडी, सातारा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत या घटना घडल्या आहेत.
सुरेश देवराव कोल्हे (वय ४६, रा. डिगर, पिशोर, ता. कन्नड) यांनी याप्रकरणात तक्रार दिली आहे. ते शेती करतात. बुधवारी (२३ जुलै) सकाळी १० ला त्यांनी त्यांचा भाचा रवी त्र्यंबक सपकाळ आजारी असल्याने त्याला हेडगेवार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रवीला ॲडमिट करून घेतले. त्यानंतर कोल्हे हे तेथून एकटेच दुपारी साडेचारला कारने (एमएच ४६ एपी १८९७) कलेक्टर ऑफिसमार्गे पिशोरला निघाले. दिल्ली गेटजवळ एक ऑटोरिक्षा त्यांच्या कारला ओव्हरटेक करून त्यांच्या कारजवळ थांबली. रिक्षामधील तिघांनी गाडी बाजूला घेण्यास सांगितले.
तिसऱ्या घटनेत सत्यप्रकाश यादव (वय ३३, रा. मुकुंदवाडी) हे २१ जुलैला रात्री ११ वाजता काम संपवून पायी घरी येत असताना मुकुंदवाडीतील बीएसएनएल कार्यालयासमोर दुचाकीवरून आलेल्या चौघांनी त्यांना अडवले. यादव यांना मारहाण करत गळ्यावर चाकू ठेवत त्यांच्या खिशातील मोबाइल हिसकावून पळून गेले. चौथ्या घटनेत ईटखेड्यातील रहिवासी सरिता औटी (वय ७२) या २१ जुलैला सायंकाळी घराजवळीलच गजानननगर येथील मंदिरातून हरिपाठ संपवून मैत्रिणीसह घरी परतत असताना विना क्रमांकाच्या दुचाकीवरून तोंड बांधून आलेल्या चोरट्यांपैकी मागे बसलेल्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पोबारा केला.