छत्रपती संभाजीनगर शहरातून ४ अल्पवयीन मुलींचे अपहरण; पदमपुरा, मुकुंदवाडी, जयभवानीनगरातील घटनांनी खळबळ

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरातून ४ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाची घटना समोर आली आहे. पदमपुरा, मुकुंदवाडी आणि जयभवानीनगरात या घटना घडल्या असून, वेदांतनगर, मुकुंदवाडी पोलिसांनी अपहरणकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल करून मुलींचा शोध सुरू केला आहे.

पहिल्या घटनेत पदमपुरा मोची मोहल्ला येथून शनिवारी (२७ जुलै) दुपारी ४ ला १४ वर्षीय ऋतुजा (नाव बदलले आहे) घरातून गायब झाली. तिचे आई-वडील मजुरी करतात. सायंकाळी पाचला तिच्या आईने मुलाला कॉल केला असता त्‍याने दुपारी ४ पासून दिदी घरात नसल्याचे सांगितले. रात्री ९ ला कामावरून घरी आल्यानंतर आईने तिचा शोध सुरू केला. गल्लीतच तिची १४ वर्षांची मैत्रीण कृतिका (नाव बदलले आहे) राहते. तिच्या घरी जाऊन चौकशी केली असता तीही घरातून गायब होती. तिला कॉल केला असता तिने कॉल उचलला नाही. दोघींना कुणीतरी फूस लावून पळवल्याची तक्रार  ऋतुजाच्या आईने वेदांतनगर पोलीस ठाण्यात केली आहे. त्‍यावरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संतोषकुमार जोशी करत आहेत.

दुसऱ्या घटनेत मुकुंदवाडीतून १५ वर्षांच्या मुलीचे अपहरण करण्यात आले आहे. शुक्रवारी (२५ जुलै) सायंकाळी सातला मुलीची आई भाजीपाला घेण्यासाठी गेली होती. त्‍यांचा मोबाइल घरीच राहिला होता. भाजीपाला घेऊन घरी आल्या असता मोबाइलवर मुलगी चुलत मामासोबत बोलत होती. तिच्या आईने तिच्या हातातून मोबाइल घेतला आणि स्वयंपाक करण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या. थोड्या वेळाने पाहिले तर मुलगी घरात दिसली नाही. तिचा नातेवाइक, मैत्रिणींकडे शोध घेतला असता ती मिळून आली नाही. कुणीतरी तिला पळवून नेल्याची शक्‍यता मुलीच्या आईने मुकुंदवाडी पोलिसांत व्यक्‍त केली आहे. त्‍यावरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष राऊत करत आहेत.

तिसऱ्या घटनेत जयभवानीनगर येथून शुक्रवारी (२५ जुलै) मध्यरात्रीनंतर १४ वर्षांच्या मुलीचे घरातून अपहरण करण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री साडेदहाला सर्व कुटुंब जेवण करून झोपले होते. सकाळी सातला मुलीच्या आईला मुलगी घरात दिसली नाही. त्‍यांनी पतीला झोपेतून उठवून सांगितले. सर्वांनी मुलीचा शोध सुरू केला. तिच्‍या मैत्रिणी, नातेवाइकांकडे चौकशी केली. मात्र ती मिळून आली नाही. अखेर मुलीच्या वडिलांनी मुकुंदवाडी पोलिसांत तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी अज्ञात अपहरणकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक डाके करत आहेत. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

डिजिटल अरेस्ट रॅकेट छत्रपती संभाजीनगरातून?; तामिळनाडूच्या पोलिसांनी वाळूज MIDC तून दोघांना केली अटक

Latest News

डिजिटल अरेस्ट रॅकेट छत्रपती संभाजीनगरातून?; तामिळनाडूच्या पोलिसांनी वाळूज MIDC तून दोघांना केली अटक डिजिटल अरेस्ट रॅकेट छत्रपती संभाजीनगरातून?; तामिळनाडूच्या पोलिसांनी वाळूज MIDC तून दोघांना केली अटक
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सध्या देशात डिजिटल अरेस्ट हे सायबर भामट्यांचे कुटील कारस्थान चर्चेत आहे. छत्रपती संभाजीनगरातही अनेकांना या...
सेंट्रल नाक्‍याजवळील दोन दुकानांना भीषण आग, लाखोंचे नुकसान
प्रेमप्रकरणातून तरुणाला बेदम मारहाण, तू तिला सोड, म्‍हणत लोखंडी पाइप डोक्‍यात घालून केले गंभीर जखमी!; ए.एस. क्‍लबजवळील घटना
पतीपासून विभक्‍त राहणाऱ्या तरुणीसोबत चर्चमध्ये ओळख, नंतर प्रेमासाठी हट्ट, पाठलाग अन्‌ माझ्यासोबत राहा म्‍हणून मारहाण!, बजाजनगरातील घटना
उस्मानपुऱ्यात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती मिरवणुकीत पोलिसांवर चाकूहल्ला, १ पोलीस जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software