रांजणगाव शेणपुंजीत जिल्हा बँकेची शाखा फोडली, पण चोरट्यांना तिजोरी नाही दिसली, वाचले साडेबारा लाख!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : वाळूज औद्योगिक वसाहत परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथील जिल्हा मध्यवर्ती बँक आज, २८ ऑक्‍टोबरच्या पहाटे अडीचच्या सुमारास चोरट्यांच्या निशाण्यावर आली. चोरटे कुलूप तोडून आत शिरले. पण त्यांना तिजोरी सापडलीच नाही. त्यामुळे बँकेतील पैसे वाचले. मात्र या घटनेमुळे बँकेची कूचकामी सुरक्षा व्यवस्था चव्हाट्यावर आली आहे. एखाद्या किराणा दुकानाची सुरक्षा व्यवस्था या बँकेपेक्षा अधिक असते, हे समोर आले.

बँकेचे शाखाधिकारी वसंत दांडेकर हे सकाळी दहाला बँक उघडण्यासाठी आले असता कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी लगेचच ही बाब वरिष्ठांना सांगितली. त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रविण पाथरकर, दिनेश बन, सुरेश कचे, संदीप तागड, ठसे तज्‍ज्ञ पथकातील प्रशांत बारोळे, अमोल सुखधाने, रामेश्वर कुकलारे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

तिजोरीत १२ लाख ३५ हजार रुपये रोख होते. चोरट्याने आधी समोरील सीसीटीव्ही कॅमेरा तोडला, नंतर कुलूप तोडले आणि बँकेत शिरला. मात्र त्याला तिजोरी कुठे आहे, हे माहीत नसल्याने तो बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर परत फिरल्याचे दुसऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या चित्रिकरणात दिसत आहे. यामुळे पैसे बँकेत होते तसेच राहिले. ज्या ठिकाणी तिजोरीत पैसे होते, त्या खोलीत अलार्म नव्हता, की मजबूत दरवाजाही नव्हता. किराणा दुकानाला या बँकेपेक्षा अधिक सुरक्षा व्यवस्था केलेली असते, इतका बेजबाबदारपणा दिसून आला. बँक वर्दळीच्या ठिकाणी असून याठिकाणी चोरीचा प्रयत्न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर यांनी लवकरच चोरटा गजाआड असेल, असा विश्वास व्यक्त केला. शाखाधिकारी दांडेकर यांच्या म्हणण्यानुसार, चोराला तिजोरी दिसली नाही. जर चोरटा तिजोरीकडे आला असता तर अलार्म वाजला असता, असा दावा त्यांनी केला. मात्र तिजोरीकडेही कोणती अलार्म सिस्टीम बसवलेली दिसली नाही. या घटनेनंतर तरी बँकेकडून सुरक्षा व्यवस्था चांगली केली जाईल, असा विश्वास व्यक्त होत आहे. श्वान पथकाने रांजणगावकडे माग काढला आणि घुटमळले. चोरीच्या प्रयत्नाप्रकरणी सायंकाळी दुपारी ४ पर्यंत बँकेकडून पोलिसांत तक्रार दिलेली नव्हती. त्यामुळे गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. शाखाधिकारी वसंत दांडेकर म्हणाले, की बँकेतून एक रुपयाही चोरी झालेला नाही. फक्त चोरीचा प्रयत्न झाला. वरिष्ठांना चोरीच्या प्रयत्नाच्या  घटनेबाबत कळविले आहे. त्यांच्या सूचनेनुसार तक्रार देण्यात येईल.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

Latest News

विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विधवा महिलेचे डोक्याचे केस धरून ओढत, धक्काबुक्की करून युवकाने तिची सोन्याची पोत घेऊन पळ...
कॉपीमुक्त अभियान सामूहिक जबाबदारी, जिल्हाधिकारी स्वामी यांची स्‍पष्ट सूचना
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा...
असा आला, असा निघून गेला...CCTV मध्ये हा कोण दिसला?, वाळूज महानगरातील घटना
आत मतमोजणी, बाहेर अलोट गर्दी, मानली संधी अन्‌ चोरट्यांनी कमावले १० लाख!; गरवारे स्टेडियमवर सोन्याचे दागिने, रोकडवर मारला हात!!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software