रिक्षाचा कट दुचाकीला लागल्याने २ टवाळखोरांचा कहर!; रिक्षाचालकाला बेदम मारहाण करून लुटले, वाळूज MIDC तील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : दुचाकीला रिक्षाचा कट लागल्याचे निमित्त करून २ टवाळखोरांनी रिक्षाचालकाला लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. नंतर त्याच्याकडील पैसे आणि मोबाइल काढून घेत पसार झाले. ही घटना रांजणगाव शेणपुंजी ते जोगेश्वरी रोडवरील साठे चौकाजवळ घडली.

सोहेल बादशाह शेख (वय २५, रा. आलमगीर मस्जिदजवळ जोगेश्वरी ता. गंगापूर) या रिक्षाचालकाने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तो बजाजनगर ते जोगेश्वरी या भागात रिक्षा चालवतो. सोमवारी (२० ऑक्‍टोबर) दुपारी २  च्या सुमारास ओॲसिस चौकाकडून जोगेश्वरीकडे रांजणगाव शेणपुंजीमार्गे जात असताना साठे चौकासमोरील वजन काट्यामागील गल्लीत जोगेश्वरीत राहणारा दत्तु पिंपळे व विकी आमराव उर्फ दणक्या हे स्प्लेंडर मोटारसायकलीने आले. त्यांना रिक्षाचा कट लागला. त्यामुळे शेखने रिक्षा थांबवली.

दत्तु पिंपळे व दणक्याने शेखसोबत वाद सुरू केला. दोघांनी बळजबरीने शेखच्या खिशातून पैसे व मोबाइल काढण्याचा प्रयत्न केला असता शेखने विरोध केला. त्यामुळे दत्तुने त्याच्याकडील कमरेला असलेला चाकू काढून धाक दाखवला. झटापटीत चाकू पडला. त्यानंतर दणक्याने तेथे पडलेला लाकडी दांडा उलचून शेखच्या खांद्यावर, पाठीवर, मांडीवर व डोक्यात मारून जखमी केले. त्यामुळे शेख जखमी होऊन जमिनीवर कोसळला. नंतर दत्तू व दणक्याने शेखच्या पॅन्टच्या खिशातील १४ हजार रुपये व ५ हजार रुपयांचा मोबाइल काढून घेतला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संजय गित्ते करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ

Latest News

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उसने घेतलेले पैसे परत देत नाही म्हणून तिघांनी मिळून स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून...
मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने चिमुकल्यावर चढवला हल्ला, चिमुकला आक्रोश करत असताना आणखी लचके तोडले, बायजीपुऱ्यातील घटनेने महापालिकेप्रती संतापाची लाट, जी. श्रीकांत पाठ थोपटून घेण्याऐवजी अधिकाऱ्यांना कामाला लावा, नागरिकांची अपेक्षा
छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी; गुरुवारपासून होणार प्रारंभ
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software