AS क्लबजवळ भीषण अपघात : भरधाव ट्रॅक्टरने मोपेडस्वार महिलेला चिरडले

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विना क्रमांकाच्या भरधाव ट्रॅक्टरने मागून जोरदार धडक देत मोपेडस्वार महिलेला चिरडले. मागील चाकाखाली येऊन महिलेचा जागीच मृत्‍यू झाला. हा भीषण अपघात धुळे-सोलापूर महामार्गावरील ए एस क्लबजवळील उड्डाणपुलावर आज, ३ डिसेंबरला सकाळी साडेदहाच्या सुमारास घडला. जयश्री लहू भड (वय ३१, रा. पांगरी, जि. बीड) असे मृत्‍यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्‍या […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विना क्रमांकाच्या भरधाव ट्रॅक्टरने मागून जोरदार धडक देत मोपेडस्वार महिलेला चिरडले. मागील चाकाखाली येऊन महिलेचा जागीच मृत्‍यू झाला. हा भीषण अपघात धुळे-सोलापूर महामार्गावरील ए एस क्लबजवळील उड्डाणपुलावर आज, ३ डिसेंबरला सकाळी साडेदहाच्या सुमारास घडला.

जयश्री लहू भड (वय ३१, रा. पांगरी, जि. बीड) असे मृत्‍यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्‍या त्यांचे नातेवाइक सुहास सुपेकर (वय मूळ रा. आकदवाडा, ता. खुलताबाद, ह. मु. समर्थनगर, सिडको महानगर १) यांच्यासोबत मोपेडने (क्र. एमएच २३, एव्ही ३३५१) धुळे-सोलापूर महामार्गाने कांचनवाडीकडे जात होत्या. एएस क्लबजवळील उड्डाणपुलावरून उतरत असताना ३६ गुण मंगल कार्यालयासमोर मागून भरधाव आलेल्या विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टरने त्यांच्या मोपेडला जोरात धडक दिली.

धडक बसताच जयश्री रस्त्यावर पडल्या. त्‍याचवेळी ट्रॅक्टर ट्रॉलीचे मागील चाक त्‍यांच्या डोक्‍यावरून गेले. डोक्याचा चेंदामेंदा होऊन जागीच मृत्यू झाला. सुहास सुपेकर किरकोळ जखमी झाले आहेत. जयश्री भड या पैठण रोडवरील कृषी विज्ञान केंद्रात सुरू असलेल्या फळ प्रक्रिया प्रकल्पाचे प्रशिक्षण घेण्यासाठी बीड जिल्ह्यातून आल्या होत्‍या. सुहास सुपेकर हे त्‍यांना प्रशिक्षणासाठी सोडायला निघाले होते. अपघाताची माहिती नागरिकांनी कळवताच वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सचिन इंगोले, पोलीस उपनिरीक्षक मनोज घोडके यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी व मृतदेह घाटी रुग्णालयात नेला. ट्रॅक्टरचालकाला ताब्यात घेतले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

ऑगस्टमधील पहिला प्रदोष व्रत ६ की ७ ऑगस्टला? पूजा करण्याची तारीख, मंत्र आणि पद्धत जाणून घ्या

Latest News

ऑगस्टमधील पहिला प्रदोष व्रत ६ की ७ ऑगस्टला? पूजा करण्याची तारीख, मंत्र आणि पद्धत जाणून घ्या ऑगस्टमधील पहिला प्रदोष व्रत ६ की ७ ऑगस्टला? पूजा करण्याची तारीख, मंत्र आणि पद्धत जाणून घ्या
प्रदोष व्रत भगवान शिव यांना समर्पित आहे. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. मान्यतेनुसार, प्रदोष व्रत...
नागपंचमीला झोका खेळताना पडून शेतकऱ्याचा मृत्‍यू, पैठणची घटना
अनोळखी पुरुषाकडून लिफ्ट घेणे महिलेला पडले महागात, वाळूजजवळ काय घडलं...
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता
घरी बसून करा हजारो रुपयांचे मोफत फेशियल!; सगळे तुम्हाला विचारतील, तुमच्या चमकत्या त्वचेचे रहस्य काय?
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software