- Marathi News
- सिटी क्राईम
- सिडको एन ७ मध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने तोडले १४ जणांचे लचके!; मनपा श्वान पथक सुटीत मश्गूल
सिडको एन ७ मध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने तोडले १४ जणांचे लचके!; मनपा श्वान पथक सुटीत मश्गूल
On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पिसाळलेल्या कुत्र्याने १४ जणांचे लचके तोडले. ही खळबळजनक घटना रविवारी (१७ ऑगस्ट) दुपारी ४ ते सायंकाळी ७:३० दरम्यान सिडको एन ७, मुकुल मंदिर शाळा परिसर, सिडको पोलिस स्टेशन परिसरात घडली. त्यामुळे या भागात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. कुत्र्याला पकडण्यासाठी महापालिकेच्या पथकाला संपर्क करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिक संतप्त झाले होते.
छत्रपती संभाजीनगरात भटक्या कुत्र्यांची समस्या मोठी झाली असताना आणि एकीकडे सिडकोत अनेकांचे लचके भटक्या कुत्र्याने तोडलेले असताना दुसरीकडे प्राणीप्रेमींना मात्र भटक्या कुत्र्यांचा पुळका आल्याचे दिसले. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांविषयी दिलेल्या निर्णयाविरोधात रविवारी सायंकाळी क्रांती चौकात निदर्शने केली. हातात पेटत्या मेणबत्त्या धरून भटक्या जिवांना आपली गरज आहे, असा संदेश दिला. निदर्शनाचे आयोजन हँड फॉर व्हॉइसलेस ग्रुप, हेल्पिंग हँड फॉर व्हॉइसलेस आणि करुणा जीव आश्रय या संस्थांनी केले होत. सर्व कुत्र्यांना एका ठिकाणी नेऊन सरकार त्यांना मारून टाकणार आहे का, असा सवाल या प्राणीप्रेमींनी केला. भटक्या कुत्र्यांबद्दल सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयाचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे. कारण ही भटक्या कुत्र्याची समस्या मोठी आहे. मात्र काही जण अशाप्रकारे निदर्शने करून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरच प्रश्न निर्माण करत असल्याने नागरिकांचा या संस्थांविरुद्धही संताप वाढत चालला आहे.
महापालिकेचे श्वान पथक छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील पूर्व भागात, डीएमआयसी हद्दीत तसेच धुळे-सोलापूर महामार्गालगतच्या शिवारात मोकाट कुत्रे आणून सोडत आहे. हा उद्योग काही वर्षांपासून सर्रास सुरू आहे. हे कुत्रे रात्री-बेरात्री कामगारांवर हल्ला करतात. धुळे - सोलापूर महामार्गालगत निपाणी, चिते पिंपळगाव, भालगाव, पिंपरी राजा या परिसरातदेखील हे कुत्रे सोडले जात आहेत. या ठिकाणीही शेतात काम करणाऱ्यांवर कुत्र्यांचे हल्ले वाढले आहेत. लाडगाव, करमाड, सटाणा, गाढे जळगाव, जयपूर, दुधड, फेरण जळगाव, शेकटा पंचक्रोशीत हे मोकाट श्वान गटागटाने फिरून शेतात काम करत असलेल्या महिला, शेतकरी तसेच शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांवर हल्ला करतात. त्यामुळे नागरिकांत संताप वाढला आहे. महापालिकेने भटके कुत्रे या भागात आणून सोडू नयेत. त्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा रास्ता रोको करू, असा इशारा या भागातील नागरिक, शेतकऱ्यांनी दिला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
पैठणच्या ‘या’ गावातून १६ वर्षीय मुलीचे अपहरण
By City News Desk
३०-३० घोटाळा : सूत्रधाराचा जिवलग मित्र सुदाम चव्हाण अटकेत!
By City News Desk
Latest News
20 Aug 2025 22:14:59
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : होमवर्क केला नाही म्हणून इतिहास विषय शिकवणाऱ्या शिक्षकाने चिमुकल्या विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केली. यात त्याच्या...