तूर पिकात गवतात लपला होता साप, गवत उचलताच शेतकऱ्यांना दंश, छ. संभाजीनगरला आणत असतानाचा मृत्‍यू, कन्‍नड तालुक्‍यातील दुर्दैवी घटना

On

कन्‍नड (सीएससीएन वृत्तसेवा) : नावडी (ता. कन्‍नड) येथील रामेश्वर काशिनाथ जाधव (वय ५२) या शेतकऱ्याचा शेतात काम करताना साप चावल्याने मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (५ ऑगस्ट) दुपारी एकच्या सुमारास घडली.

जाधव हे गावाजवळील शेतात तूर पिकातील गवत उचलत होते. त्‍याचवेळी त्यांच्या डाव्या पायाला सापाने चावा घेतला. त्‍यांना कुटुंबीयांनी कन्‍नड येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र प्रकृती खालावल्याने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. मंगळवारी रात्री दहाला नावडी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, मुलगा, मुलगी, जावई असा परिवार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वास्तुशास्‍त्र : घराची बाल्कनी सकारात्मक उर्जेचा स्रोत

Latest News

वास्तुशास्‍त्र : घराची बाल्कनी सकारात्मक उर्जेचा स्रोत वास्तुशास्‍त्र : घराची बाल्कनी सकारात्मक उर्जेचा स्रोत
वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून घराची बाल्कनी महत्त्वाची आहे. बाल्कनी वास्तुशास्त्रानुसार बांधली गेली असेल आणि त्याची देखभाल देखील वास्तु सूचनांनुसार केली गेली असेल,...
Tech News : चुकूनही गुगलवर सर्च करू नका या ४ गोष्टी अडचणीत सापडाल, तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते...
सुनील पाटील पैठणचे नवे SDPO, अवैध धंदेवाल्यांवर फास आवळणार
रक्षाबंधनासाठी घरी येताना भरधाव पिकअपची धडक, दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्‍यू, वैजापूर तालुक्‍यातील दुर्घटना
लग्‍नासाठी आलेल्या पाहुण्याचा नागडोहात बुडून मृत्‍यू, कन्‍नडची घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software